शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आंध्रात मतदानाच्या वेळी हिंसाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 4:53 AM

दोन स्थानिक नेत्यांचा झाला मृत्यू; ईव्हीएमविषयी तक्रारी; छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट

नवी दिल्ली : देशातील ९१ लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी साधारणपणे शांततेने मतदान पार पडले असले तरी आंध्र प्रदेश व काश्मीरमध्ये ईव्हीएमविषयी अनेक तक्रारी आल्या. आंध्र प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी द्विवेदी यांनाच त्याचा फटका बसल्याचे आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले. आंध्रातच तेलगू देसम व वायएसआर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये हाणामारी झाली आणि त्यात दोन जण मरण पावले, तर छत्तीसगडमध्ये दोन ठिकाणी नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. मात्र सुदैवाने त्यात प्राणहानी झाली नाही.

जम्मू भागातील मतदारसंघांत भाजपच्या उमेदवाराला मतदान करा, असे सुरक्षा रक्षक मतदारांना सांगत असल्याचा व्हिडीओ ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांनी सादर केला आहे. तेथील काही मतदान केंद्रांत ईव्हीएमवर हाताच्या चिन्हाचे बटण दाबले जात नसल्याच्या तक्रारी काही मतदारांनी केल्या. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये हाताचे बटण दाबल्यावर कमळाला मत जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रे सकाळी सुरू होण्यात अडचणी आल्याने मतदानास विलंब झाला. एका ठिकाणी तर या यंत्रांच्या चाचणीच्या वेळी झालेले मतदान रद्द करण्यात आले नव्हते. त्यामुळे ते रद्द करताना नंतर ज्यांनी मतदान केले, तेही रद्द झाले.दिल्लीजवळील, उत्तर प्रदेशच्या नॉयडा भागात पोलिसांना जी जेवणाची पाकिटे देण्यात आली, त्यावर नमो फूड्स असे छापलेलेहोते. ती भाजपतर्फे देण्यात आल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला असला तरी त्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील फरसगाव येथे निवडणूक कर्मचाºयांना संरक्षणात मतदान केंद्रांवर नेले जात असताना पहाटे सव्वाचार वाजता नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. मात्र सीआरपीएफ जवानांनी या कर्मचाºयांना अन्य मार्गाने नेल्याने प्राणहानी झाली नाही. विजापूर येथे ४ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून तीन रायफली जप्त करण्यात आल्या.

आंध्रात विधानसभेसाठीचे मतदान सुरू असताना अनंतपूर जिल्ह्यातील मीरापूरममध्ये झालेल्या हिंसाचारात तेलुगू देसम व वायएसआर काँग्रेसचे दोन स्थानिक नेते ठार झाले. ुवायएसआर काँग्रेसचे आमदार जी. श्रीनिवास रेड्डी जखमी झाले. जन सेनेच्या एका उमेदवाराने ईव्हीएम नीट चालत नसल्याने ते जमिनीवर फेकले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.

मतदानास मज्जावउत्तर प्रदेशात कैराना मतदारसंघात आपणास मतदान करू दिले नाही. आपल्याऐवजी निवडणूक अधिकाºयांनीच मतदान केले, असा आरोप दोन मतदारांनी केला. त्यामुळे मतदानावर बहिष्काराचा निर्णय गावकºयांनी घेतला. त्यामुळे तिथे गोंधळ उडाला आणि तो थांबविण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी हवेत गोळीबार केला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी तिथे जाऊ न मतदारांची समजूत घातली. त्यानंतर मतदान पूर्ववत सुरू झाले.

टॅग्स :Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019