अलीगढ मुस्लिम विद्यापीठात हिंसाचार, एकाचा मृत्यू
By Admin | Updated: April 24, 2016 16:03 IST2016-04-24T16:03:21+5:302016-04-24T16:03:21+5:30
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या आवारात शनिवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात हिंसाचार, एकाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. २४ - अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या आवारात शनिवारी रात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी झालेल्या हिंसाचारात एका माजी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मुमताझ वसतिगृहात रहाणा-या विद्यार्थ्याला मारहाण करुन त्याची खोली पेटवून देण्यात आल्यानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली.
ज्या विद्यार्थ्याला मारहाण झाली तो विद्यार्थी तक्रार दाखल करण्यासाठी प्रॉक्टरच्या कार्यालयात गेला. या प्रकरणाची बातमी वा-यासारखी पसरताच दोन विरोधी गटाचे विद्यार्थी समोरासमोर आले आणि हिंसाचार सुरु झाला. प्रॉक्टरच्या कार्यालयाजवळ दोन्ही गटांकडून झालेल्या गोळीबारात मेहताब या माजी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
हिंसक झालेल्या विद्यार्थ्यांनी जीप जाळली व सहा दुचाकी जाळल्या. प्रॉक्टरच्या कार्यालयातही तोडफोड केली. या घटनेनंतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या आवारात रॅपिड अॅक्शन फोर्सला तैनात करण्यात आले आहे.
Security deployed at AMU campus, Aligarh (UP) after clash between two groups of students late last night. pic.twitter.com/qetLpteHoT
— ANI UP (@ANINewsUP) April 24, 2016