नवी दिल्ली : सीएएविरोधात आंदोलनात मंगळवारीही हिंसाचार व गोळीबार झाला. गोकुळपुरी येथे दोन गटांतील हिंसाचारात एक पोलीस हेड कॉन्स्टेबल व एक स्थानिक रहिवासी यांचा मृत्यू झाला. पोलीस उपायुक्तही जखमी झाले. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी उत्तर पूर्व दिल्लीतील दहा ठिकाणी जमावबंदी लागू केली आहे. जवामाने पेट्रोल पंपही पेटविण्याचा प्रयत्न केला. मौजपूर परिसरात सीएए समर्थक व विरोधक दोघांमध्ये दगडफेक झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर व लाठीमाराचाही वापर करावा लागला. दगडफेकीत काही पोलीसही जखमी झाले आहेत.
सीएएविरोधी आंदोलनात हिंसा; पोलिसासह दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 03:51 IST