पालिकेच्या आशीर्वादाने अनधिकृत होर्डिंग अधिकार्यांचे दुर्लक्ष : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:13+5:302015-02-18T00:13:13+5:30
नवी मुंबई : उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश देवूनही महापालिका प्रशासन शहरातील अनधिकृत होर्डिंगना अभय देत आहे. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होऊन पालिकेचा महसूल बुडत आहे.

पालिकेच्या आशीर्वादाने अनधिकृत होर्डिंग अधिकार्यांचे दुर्लक्ष : उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन
न ी मुंबई : उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश देवूनही महापालिका प्रशासन शहरातील अनधिकृत होर्डिंगना अभय देत आहे. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होऊन पालिकेचा महसूल बुडत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊ लागल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी जोरदार होर्डिंगबाजी सुरू केली आहे. रेल्वे स्टेशन,महत्त्वाचे चौक व महत्त्वाच्या रोडवर मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावले आहेत. उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते विनापरवाना होर्डिंग लावत असून, दबावामुळे अधिकारी कारवाई करत नाहीत. प्रशासन ठाम भूमिका घेत नसल्यामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. काही ठिकाणी रोडच्या कडेला लावलेल्या होर्डिंगमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच ठिकाणी ५ ते ७ होर्डिंग लावण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. नेरूळ रेल्वे स्टेशन, वाशी महामार्ग, ऐरोली, सीवूड व इतर अनेक ठिकाणी अशाप्रकारे अनधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणात आहेत. महापालिकेचे विभाग अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. फोटो१७होर्डींग, नावाने आहेनेरूळ रेल्वे स्टेशनसमोर लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग.