विनोद दोशी फेलोशिप जाहीर

By Admin | Updated: February 2, 2015 23:52 IST2015-02-02T23:52:55+5:302015-02-02T23:52:55+5:30

वाघ, थत्ते, देशमुख, लोधी यांना विनोद दोशी फेलोशीप

Vinod Doshi Fellowship Released | विनोद दोशी फेलोशिप जाहीर

विनोद दोशी फेलोशिप जाहीर

घ, थत्ते, देशमुख, लोधी यांना विनोद दोशी फेलोशीप
पुणे : साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे कलेच्याप्रती समर्पित वृत्तीने काम करणा-यांना दिली जाणारी विनोद दोशी फेलोशीप संजुक्ता वाघ, केतकी थत्ते, अमेय वाघ, सागर देशमुख व सागर लोधी यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त अशोक कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. नाटककार सतीश आळेकर, रवींद्र दामले, मोहित टाकळकर यावेळी उपस्थित होते.
फेलोशीप वितरण समारंभ शनिवार दि.21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता घरकुल लॉन्स येथे प्रसिद्ध लेखिका पुष्पा भावे यांच्या हस्ते होईल. एक लाख रुपये अशी फेलोशीपची रक्कम आहे. फेलोशीपचे यंदा दहावे वर्ष आहे. कलेच्या क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन काम करणा-्या व कला क्षेत्रातच महत्वाकांक्षी कारर्किद करु इच्छिणा-्यांना प्रतिष्ठानतर्फे ही फेलोशीप दिली जाते.
केतकी थत्ते बालमोहन विद्यामंदिर, दादर येथे शिक्षण घेत आहे, संजुक्ता वाघ कथ्थक नृत्यविशारद आहेत, सागर देशमुख पुण्यातील आसक्त कलामंचचे सदस्य आहेत, सागर लोधी यांनी पुण्याच्या ललित कला केंद्रातून दिग्दर्शन व संहिता लेखनाची पदवी संपादन केली आहे तर अमेय वाघ संगीत रंगभूमी व राहें संस्थांशी संबंधीत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: Vinod Doshi Fellowship Released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.