विनायक सोनवणे खून खटल्यात तिघांना जन्मठेप
By admin | Updated: December 5, 2015 23:50 IST
न्यायालयाचा निकाल : दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी
विनायक सोनवणे खून खटल्यात तिघांना जन्मठेप
न्यायालयाचा निकाल : दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीजळगाव: शिव कॉलनीतील रहिवाशी तथा नगरसेवक विनायक काशीनाथ सोनवणे खून खटल्यात आरोपी राजहंस उर्फ नाना सोनवणे, त्यांचा मुलगा पवन सोनवणे व अमर सोनवणे या तिघांना शनिवारी न्या.एम.ए.लव्हेकर यांनी जन्मठेप व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. अमर याला कलम ११४ सह ३०२ अन्वये दोषी धरण्यात आले आहे. १८ डिसेंबर २०१२ रोजी दुपारी १२.४५ वाजता विनायक सोनवणे यांचा लॉ कॉलेज कॉलेज समोर खून झाला होता. याबाबत शिवाजी चुडामन पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. १३ मार्च २०१३ रोजी तपासाधिकारी वाय.डी.पाटील यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.या खटल्यात सरकारपक्षातर्फे ३० साक्षीदार तपासण्यात आले. सरकार व बचाव पक्षाच्या वतीने चार ते पाच सत्रात युक्तीवाद झाला. तसेच दोन्ही बाजूंनी लेखी युक्तीवादही सादर झाला होता. या गुन्ातील तिन्ही आरोपी घटना घडल्याच्या दिवसापासून कारागृहात आहेत. सरकारतर्फे ॲड.गोपाळ जळमकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड.बी.के.शिंदे यांनी सहकार्य केले तर आरोपीच्यावतीने ॲड.सुशील अत्रे यांनी काम पाहिले.या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.