शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गावच्या सुपुत्राने देशासाठी बलिदान दिले, पार्थिव येणार होते, गावकऱ्यांनी रस्त्यासाठी जमीन दान दिली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 09:56 IST

जवान विजय कुमार हे हिमाचल येथून गरीब कुटुंबातून येतात.

लेह-लडाखमध्ये शनिवारी झालेल्या अपघातात हिमाचल येथील एक जवान शहीद झाले. लान्स नाईक विजय कुमार असं या जवानाचे नाव आहे, त्यांचं गाव हिमाचल येथील दिमानी ब्लॉक बसंतपूर, जिल्हा शिमला ग्रामीण येथे आहे जवान विजय कुमार यांचे पार्थिव विमानाने चंदीगडला नेण्यात आले. यानंतर त्यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने शिमला येथे पोहोचले. मृतदेह शिमल्याहून बसंतपूरला रस्त्याने आणण्यात आला. शहीद विजय कुमार यांच्या गावकऱ्यांना विजय कुमार शहीद झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी कधी पोहोचेल आणि त्यांचे अंतिम दर्शन कधी होईल, याकडे सर्वजण वाट पाहत होते. 

जगावर वचक ठेवायला निघालेले! रशियाचे लुना २५ चंद्रावर काय आदळले, तिकडे चीनला जबर दणका बसला

विजय कुमार यांच्याबद्दल गाववाल्यांना खूप आपुलकी होती. त्यांचं गाव ग्रामीण भागातील असल्यामुळे रस्ते पक्के नव्हते. त्यात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. पण, गावकऱ्यांनी काही तासातच स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता बनवला. हा रस्ता ४०० मीटरचा आहे. रविवारी रात्री ८ वाजता रस्ता बनवण्याचे काम सुरू झाले आणि दुसऱ्या दिवशी रस्ता तयार झाला. 

रस्त्यासाठी जमीन केली दान

शहीद विजय कुमार यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक तेथे जमतील हे गावकऱ्यांना माहीत होते. विजय कुमार यांचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेण्यास कोणतीही अडचण येऊ नये, म्हणूनच हा रस्ता एका रात्रीत तयार करण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी गावकऱ्यांनी आपली जमीनही दान केली होती. एवढेच नाही तर ग्रामस्थांनी या रस्त्याला शहीद विजयकुमार मार्ग असे नाव दिले आहे. ज्यांना येणारी पिढी आणि गावातील प्रत्येक व्यक्ती विजय कुमार यांच्या हौतात्म्याची आठवण ठेवेल. विजय कुमार यांच्या कुटुंबात फक्त आई-वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. एक मुलगा दीड वर्षाचा तर दुसरा सुमारे ७ वर्षांचा आहे. विजय कुमार यांनी सैन्यात भरती होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. विजय कुमार यांनी सैन्यात १७ वर्षे सेवा दिली. स्वभावाने अतिशय चांगले होते. सगळ्यांच्यात मिळून मिसळून होते, विजय जेव्हा कधी गावात यायचे तेव्हा ते गावातील मुलांना खेळ आणि सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित करत असे, असं गावकरी सांगतात. 

शनिवारी लडाखमध्ये झालेल्या अपघातात हवालदार विजय कुमार शहीद झाल्याची बातमी घरी पोहोचताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. शहीद विजय यांच्या अंतिम यात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशIndian Armyभारतीय जवान