शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाला 'सीमा' नाही! कॅन्टीनवाला पाकिस्तानी तरूणीच्या जाळ्यात; लष्कराची गुप्त माहिती पुरवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 12:45 IST

प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही.

प्रेमाला सीमा नसते, प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. याच प्रेमात वेडा झालेल्या तरूणाने पाकिस्तानातील तरूणीला गुप्त माहिती पुरवली. राजस्थानमधील बिकानेर येथील लष्करी तळावर एका पाकिस्तानी गुप्तहेराला पकडण्यात यश आले आहे. हा पाकिस्तानी गुप्तहेर दुसरा कोणी नसून लष्कराच्या कॅन्टीनचा संचालक विक्रम सिंग आहे. बिकानेरच्या महाजन आर्मी कॅन्टीनचा संचालक पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना पकडला गेला. तो पाकिस्तानातील एका महिलेच्या संपर्कात होता आणि तिच्या सूचनेनुसार तो लष्कराच्या संवेदनशील ठिकाणांचे फोटो आणि कागदपत्रांचे फोटो काढून त्या महिलेला पुरवत होता.

संबंधित संचालकाचा माग काढल्यानंतर राजस्थान पोलिसांच्या गुप्तचर विभागाने त्याला अटक केली आहे. राजस्थानातील डुंगरपूरचा रहिवासी असलेला विक्रम एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता. तो पाकिस्तानातील महिलेच्या सौंदर्याने आकर्षित झाला आणि तिच्या प्रेमापोटी त्याने तिला गुप्त माहिती शेअर करण्यास सुरूवात केली. माहिती मिळताच आर्मी इंटेलिजन्सच्या मदतीने या गुप्तहेराला रंगेहाथ अटक करण्यात आली.

माहितीनुसार, आरोपी विक्रम हा बिकानेरमधील रहिवासी असून त्याच्याकडे महाजन आर्मी परिसरातील वजन कॅन्टीनचे कंत्राट होते. तो लष्कराच्या परिसरात कॅन्टीन चालवायचा आणि संधी पाहून लष्कराच्या परिसरातून संवेदनशील फोटो आणि कागदपत्रे काढून पाकिस्तानी हँडलरकडे पाठवत होता. राजस्थान इंटेलिजन्स टीमने त्याच्या संभाषणाचा मागोवा घेतला तेव्हा ही बाब समोर आली.

असा झाला खुलासायानंतर राजस्थान इंटेलिजन्सने संपूर्ण घटना मिलिटरी इंटेलिजन्स बिकानेरला सांगितली आणि त्यानंतर संयुक्त कारवाईत या गुप्तहेरला रंगेहाथ पकडण्यात आले. अटकेच्या वेळी तो एका पाकिस्तानी महिलेला काही फोटो पाठवण्याचाही प्रयत्न करत होता. राजस्थान इंटेलिजन्सचे अतिरिक्त महासंचालक संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रमचा मोबाईल अनेक दिवसांपासून ट्रॅक केला जात होता. त्याच्या फोनवरून सगळी माहिती मिळत होती. 

हनीट्रॅपचा बळीपाकिस्तानी महिलेसोबतचे विक्रमचे संभाषणही रेकॉर्ड करण्यात आले. यावेळी आरोपी स्वतः हनीट्रॅपचा बळी असल्याचे उघड झाले. त्याला हनीट्रॅपचा बळी बनवणाऱ्या पाकिस्तानी महिलेने त्याला गुप्तचर माहिती काढण्याचे प्रशिक्षणही दिले होते. आरोपी विक्रमला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, असे पोलिसांनी सांगितले. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी विक्रमने फेसबुकच्या माध्यमातून या महिलेशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. मेसेंजरवर चॅटिंग करत असताना दोघांनी आपले मोबाईल नंबर शेअर केले आणि नंतर बोलणे सुरू केले. संबंधित महिलेने विक्रमचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले होते आणि आता ते व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला देशविरोधी कारवाया करण्यास ती भाग पाडत होती.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलPakistanपाकिस्तानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट