विखे-कर्डिले यांची सहमती एक्सप्रेस राहुरी बाजार समिती : विकास आघाडीची स्थापना,विखेंच्या सभेला सर्वपक्षीय

By Admin | Updated: July 10, 2015 21:26 IST2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30

राहुरी : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकीय चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले़ टाकळीमिया येथे झालेल्या सभेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राहुरी तालुका विकास आघाडीची स्थापना केल्याची घोषणा केली़ या आघाडीचे नेतृत्व विखे यांच्यासह आमदार शिवाजी कर्डिले करणार असल्याने विखे-कर्डिले यांची सहमती एक्सप्रेस बाजार समितीत धावणार असल्याचे स्पष्ट झाले़

Vikhe-Chardi's Sammati Express Rahuri Bazar Committee: Vikas Aghadi, establishment of Opposition, Opposition to Opposition | विखे-कर्डिले यांची सहमती एक्सप्रेस राहुरी बाजार समिती : विकास आघाडीची स्थापना,विखेंच्या सभेला सर्वपक्षीय

विखे-कर्डिले यांची सहमती एक्सप्रेस राहुरी बाजार समिती : विकास आघाडीची स्थापना,विखेंच्या सभेला सर्वपक्षीय

हुरी : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकीय चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले़ टाकळीमिया येथे झालेल्या सभेत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी राहुरी तालुका विकास आघाडीची स्थापना केल्याची घोषणा केली़ या आघाडीचे नेतृत्व विखे यांच्यासह आमदार शिवाजी कर्डिले करणार असल्याने विखे-कर्डिले यांची सहमती एक्सप्रेस बाजार समितीत धावणार असल्याचे स्पष्ट झाले़
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत टाकळीमिया येथे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मेळावा झाला़ या मेळाव्यात माजी खासदार व बाजार समितीतील सत्ताधारी प्रसाद तनपुरे यांना शह देण्यासाठी विखे यांनी राहुरी तालुका विकास आघाडीची घोषणा केली़ राहुरी पंचायत समितीच्या सभापती मंगल निमसे यांच्या निवासस्थानासमोर ही सभा झाली़ अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रावसाहेब साबळे हे होते़
कांद्यामध्ये कमिशन खाणार्‍या सत्ताधार्‍यांनी स्वत:ची घरे भरली़ गैरकारभाराचे अनेक विक्रम मोडीत काढले़ शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍यांना घरी पाठविण्यासाठी सर्वांनी काम करण्याची गरज राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केली़ शेतकर्‍यांचे वाटोळे करणार्‍यांचे दिवस भरले आहेत़ निवडणुकीसंदर्भात चौघांची समिती स्थापन करण्याची सूचनाही विखे यांनी केली़
आमदार शिवाजीराव कर्डिले यांना बरोबर घेऊन सर्वांनी एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरविले असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले़ लोकप्रतिनिधी म्हणून तनपुरे कारखान्यात कर्डिले बजावित असलेल्या भूमिकेचे विखे यांनी कौतुक केले़ बाजार समितीची निवडणूक राहुरी तालुक्याच्या राजकारणाला दिशा देणारी ठरणार असल्याचे संकेत दिले़
माजी सभापती शिवाजी गाडे यांनी राहुरी तालुक्यात कोपर्‍याकापर्‍यात शेतकरी मंडळ आहे़ त्याची दखल घ्या, असा टोला मारला़ सत्ताधार्‍यांनी केलेल्या कारभाराचे उत्तर येत्या निवडणुकीत त्यांना पायउतार होण्यानेच मिळेल, असे सांगितले़ प्रास्तविक राहुरी तालुका दूध संघाचे अध्यक्ष तानाजी धसाळ यांनी केले़ भाजपाचे आसाराम ढुस, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अमृत धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेश करपे, दत्तू आढाव, प्रदीप होन, रावसाहेब साबळे, उत्तमराव म्हसे, किशोर वने यांची भाषणे झाली़
कार्यक्रमास दादा सोनवणे, साहेबराव गाडे, ज्ञानदेव निमसे, भिमराज हारदे, संजय राका, सूरसिंग पवार, नामदेव ढोकणे, शाम निमसे, अर्जुनराव पानसंबळ, दत्ता पाटील, विठ्ठल बिडगर, पोपटराव लाटे आदी उपस्थित होते़
़़़़़़़़़
तनपुरे साखर कारखान्याची माहिती घेत आहे़ काही अंधारात तर काही कागदोपत्री व्यवहार आहे़ साखर कारखानदारी मोडीत काढायची नसेल तर खासगी व्यक्तीला कारखाना चालविण्यास देणे योग्य नाही़ सहकारी साखर कारखान्याला चालविण्यास देणे योग्य ठरेल़ कामधेनू टिकली पाहिजे हिच अपेक्षा आहे़
-राधाकृष्ण विखे, विरोधी पक्ष नेते, विधानसभा

Web Title: Vikhe-Chardi's Sammati Express Rahuri Bazar Committee: Vikas Aghadi, establishment of Opposition, Opposition to Opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.