शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'विकास पागल हो गया है' , मोदींच्या 'घरात' राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 18:30 IST

गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गुजरातचं सरकार केवळ 5-6 उद्योगपतींसाठी चालवलं जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी रिमोट कंट्रोलने गुजरात सरकार चालवत आहेत अशी टीका त्यांनी केली.

अहमदाबाद - गुजरात दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गुजरातचं सरकार केवळ 5-6 उद्योगपतींसाठी चालवलं जात असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी रिमोट कंट्रोलने गुजरात सरकार चालवत आहेत अशी टीका त्यांनी केली. या वेळी एका सभेत बोलताना त्यांनी विकास को क्या हुआ है? असा प्रश्न विचारून मोदी सरकारला चिमटा काढला. राहुलच्या या प्रश्नावर लोकांनी 'गांडो थयो छे' (वेडा झाला आहे) असं उत्तर देत सरकारविरोधातील नाराजी व्यक्त केली. 

यावेळी बोलताना, खिजदियातील सभेत राहुल गांधींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावरुन भाजपवर टीका केली.   'मेड इन इंडिया'चं आश्वासन दिलं होतं. पण सरदार पटेल यांचा पुतळा चीनमध्ये तयार होतो आहे, त्यामागे ‘मेड इन चायना’ असा शिक्कादेखील आहे. देशासाठी ही बाब लाजिरवाणी असल्याची टीका राहुल गांधींनी केली. गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून पुतळा तयार होत असून नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2013  मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते.

जामनगरमध्ये बोलताना, राहुल गांधी म्हणाले, गुजरातमधील विद्यमान सरकार हे रिमोट कंट्रोलने चालते, दिल्लीतून हा रिमोट ऑपरेट केला जातो. राज्यातील सरकार हे दिल्ली नव्हे तर गुजरातमधूनच चालवणे गरजेचे आहे. कॉंग्रेसचं सरकार गुजरातमधूनच चालेल, अशी ग्वाही देत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेसचं सरकार आल्यास विकासकामं पुन्हा सुरू केली जातील, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल आणि सगळ्यांना हक्काचं घरही देऊ, अशी आश्वासनं राहुल यांनी दिली. पटेल समाजावर मोदी सरकारने गोळीबार केला, पण काँग्रेसला सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे असे सांगत त्यांनी पाटीदार समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी