शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Vikas Dubey Encounter: गाडी उलटताच बंदूक हिसकावून विकास दुबेचा पळून जाण्याचा प्रयत्न; रस्त्याच्या शेजारीच एन्काऊंटरचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 09:16 IST

Vikas Dubey Encounter: विकासला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात

लखनऊ: कानपूरमध्ये आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणणारा कुख्यात गँगस्टर विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकासला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे पोलिसांनी त्याला मृत घोषित केलं. गेल्या काही दिवसांपासून विकास पोलिसांकडून गुंगारा देत होता. संपूर्ण उत्तर प्रदेशात पोलिसांकडून त्याचा शोध घेतला होता. अखेर काल मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधून त्याला अटक झाली.एसटीएफच्या गाडीमधून पोलीस विकासला कानपूरला नेत होते. त्यावेळी गाडीला अपघात झाला. त्यानंतर विकासनं पोलीस अधिकाऱ्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस आणि विकास दुबे यांच्यात चकमक सुरू झाली. त्यात विकाससह काही पोलीसदेखील जखमी झाले. त्यांना कानपूरमधल्या लाला लजपत राय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. साडे सहाच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला.गाडीचा अपघात पाहून काही लोक घटनास्थळी पोहोचले. मात्र गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानं ते तिथून निघून गेले. पोलिसांची कार अतिशय वेगात असल्यानं तिला अपघात झाल्याचं सांगितलं जातं आहे. एन्काऊंटर आणि अपघातात काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

कसा पकडला विकास दुबे?गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश विकासचा शोध घेत होते. अखेर काल मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना विकास दुबेला तिथल्या काही जणांनी ओळखलं. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर विकासला अटक झाली. एका सुरक्षा रक्षकानं विकास दुबेला ओळखल्यामुळे तो पकडला गेला. विशेष म्हणजे त्याआधी विकास दुबे त्या परिसरात फोटो काढत होता. पोलिसांनी अटक केल्यावरही विकासच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नव्हता. विकास दुबेची ओळख पटल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस त्याला गाडीत बसवत असताना तिथे काही लोक गोळा झाले होते. त्यांना पाहून तो 'होय, मीच विकास दुबे, कानपूरवाला' असं ओरडलं. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी विकासला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबे