शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Vikas Dubey Encounter: विकास दुबेचा एन्काऊंटर स्क्रिप्टेड? गाडीला अपघात होण्याआधीचा VIDEO समोर; संशय वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 11:33 IST

एन्काऊंटर होण्याआधीचा व्हिडीओ समोर आल्यानं पोलिसांबद्दलचा संशय वाढला

कानपूर: आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे. आज सकाळी विकासला कानपूरला नेलं जातं होतं. त्यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका कारला अपघात झाला. विकास दुबे याच कारमध्ये होता. कार उलटताच त्यानं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.विकास दुबेच्या एन्काऊंटरच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी घडलेल्या घडामोडी संशयास्पद आहेत. कानपूरच्या भौती भागात रस्त्याशेजारी विकासचा एन्काऊंटर झाला. विकासनं पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र पोलिसांनी केलेल्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. विकास दुबेला उज्जैनहून कानपूरला आणलं जात असताना पोलिसांच्या ताफ्यापाठोपाठ माध्यम प्रतिनिधींच्या गाड्यादेखील होत्या. मात्र त्यांच्या गाड्या रस्त्यावर अचानक थांबवण्यात आल्या. विशेष म्हणजे गाड्या रोखण्यात आलेल्या भागापासून पुढे काही अंतरावर विकासचा एन्काऊंटर झाला. माध्यम प्रतिनिधींच्या गाड्या रोखण्यात आल्यानंतर पोलिसांचा ताफा पुढे गेला. त्यानंतर पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. पोलिसांनी माध्यमांच्या गाड्या रोखल्याचा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे. कानपूरच्या सचेंडी भागात पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींच्या गाड्यांना रोखलं. या गाड्यांसमोर बॅरिकेड्स लावण्यात आले. कानपूर पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला. त्यांनी संपूर्ण रस्ताच रोखून धरला. सकाळी साडे सहाच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला.अचानक रस्ता रोखून धरण्यात आल्यानं माध्यमांचे प्रतिनिधी अडकले. त्यामुळे पोलिसांचा ताफा पुढे निघून गेला. याच ताफ्यातील एक गाडी उलटली. याच गाडीत विकास दुबे होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. गाडी उलटताच विकासनं एका पोलिसाकडील पिस्तुल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला सरेंडर करण्यास सांगितलं. मात्र त्यानं नकार दिल्यानं पोलिसांनी गोळीबार केला. त्यात विकास मारला गेला. या एन्काऊंटरमध्ये ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले. शेवटच्या चौकशीत विकास दुबेनं दिली मोठी कबुली; उत्तर प्रदेश पोलीस गोत्यात येणार?आठ पोलिसांचं हत्याकांड घडवणारा विकास दुबे पोलीस एन्काऊंटरमध्ये ठारलेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलंगाडी उलटताच बंदूक हिसकावून विकास दुबेचा पळून जाण्याचा प्रयत्न; रस्त्याच्या शेजारीच एन्काऊंटरचा थरारगँगस्टर विकास दुबेचा खात्मा, जप्त केलेल्या ‘त्या’काळ्या बॅगेतून उलगडणार अनेक रहस्य

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबे