शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

कंगना रानौतवर भडकला ऑलिम्पिक पदक विजेता बॉक्सर; शिवसेनेवरील प्रश्नावरही दिलं रोखठोक उत्तर!

By स्वदेश घाणेकर | Updated: December 3, 2020 15:22 IST

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने ( Kangana Ranaut)  दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि ती तोंडघशी पडली.

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणा-या कंगना राणौतने ( Kangana Ranaut)  दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आणि ती तोंडघशी पडली. या आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबच्या  एका वयोवृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे  ट्वीट तिने केले आणि  काही  वेळात तिने हे  ट्वीट डिलीटही केले. पण तोपर्यंत या  ट्वीटचे स्क्रिनशॉट्स व्हायरल झाले होते. यावरून कंगना जबरदस्त ट्रोल झाली.आता सिंगर व अभिनेता दिलजीत दोसांजने कंगनाच्या या  ट्वीटवर सणसणीत प्रतिक्रिया दिली. पण, यानंतर कंगनानं दिलजीत दोसांज ( Diljit Dosanjh) याला करण जोहर के पालतू असे म्हटले आणि त्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेत्या बॉक्सर विजेंदर सिंग ( Vijender Singh) यानेही उडी मारली.

दिलजीतने संबंधित शेतकरी महिलेचा व्हिडीओ पोस्ट करत कंगनाला चांगलेच सुनावले. ‘कंगना, पुराव्यासोबत हे ऐक. बंदा इतना भी अंधा नहीं होना चाहिए,’असे या पोस्टसोबत दिलजीतने लिहिले. त्यावर कंगनानं उत्तर दिले की,''ओह करन जोहर के पालतू... जी आजी शाहीन बाग येथे नागरिकत्वासाठी आंदोलन करत होती तिच बिलकीस बानो आजी शेतकऱ्यांच्या आंदोलनात दिसली. महिंदर कौर जी यांना तर मी ओळखतही नाही. तुम्ही लोकांनी काय ड्रामा सुरू केला आहे? आताच्या आता हे थांबवा.''  त्यावर २००८च्या बिजींग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा आणि सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या विजेंदर सिंगनं प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, गलत पंगा ले लिया बहन.. त्यावर, तू पण शिवसेना तयार करतोस का... भावा? असा टोला कंगनान मारला. विजेंदरनं त्यावर प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, ती तर तयार झालीच आहे आणि चांगल काम करत आहे. 

 काय होते कंगनाचे ट्विट?शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिंदर कौर या 87 वर्षांच्या आहेत. याच आजीची तुलना  कंगनाने  शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादीसोबत केली होती. ‘ही १०० रूपयात अव्हेलेबल आहे. शाहीन बागमध्येही हीच महिला होती आणि आता शेतकरी आंदोलनातही तिच आहे,’ असे  ट्वीट कंगनाने केले होते. यानंतर सोशल मीडियावरून कंगानाचा विरोध होऊ लागला होता. ट्रोल होताच कंगनाने हे  ट्वीट डिलीट केले होते.

आजीनेही दिले उत्तरकंगनाने भलेही  ट्वीट डिलीट केले. पण म्हणून टीका कमी झाली नाही. महिंदर कौर यांनीही कंगनाला खरपूस शब्दांत उत्तर दिले. ‘माझ्याकडे 13 एकर जमीन आहे. मला 100 रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कोरोनामुळे  तुझ्याकडे (कंगना) काम नसेल तर तुच माझ्या शेतात मजुरीला ये,’ अशा शब्दांत या आजीने कंगनाला सुनावले.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतFarmer strikeशेतकरी संप