शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
4
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
5
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
6
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
7
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
8
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
9
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
10
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
11
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
12
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
13
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
14
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
15
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
16
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
17
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
19
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
Daily Top 2Weekly Top 5

'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 00:15 IST

करुर येथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर अभिनेता विजय विमानतळावर पाहायला मिळाला.

Vijay Rally Stampede: तामिळनाडूत प्रसिद्ध अभिनेते विजय याच्या रॅलीत  झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ५८ हून अधिक लोक जखमी आहेत. शनिवारी तामिळनाडूतील करूर येथे ही चेंगराचेंगरी झाली, जिथे विजय यांच्या रॅलीसाठी मोठी गर्दी जमली होती. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींपासून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी दुःख व्यक्त केलं आहे. दुसरीकडे या घटनेनंतर अभिनेता विजय याने एक्स पोस्टवरुन आपली प्रतिक्रिया दिली. तमिळनाडूतील करूर येथे तमिळगा वेत्री कझगम प्रमुख विजय याच्या एका भव्य राजकीय रॅलीत हजारो लोक जमले होते. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ३६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रचंड गर्दीमुळे ही चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे अनेक जण बेशुद्ध पडले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चेंगराचेंगरीनंतर विजय तिरुचिरापल्ली विमानतळावर दिसला. इतक्या मोठ्या घटनेनंतर विजय अशा पद्धतीने का निघून गेला, यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या घटनेवर विजयने दुःख व्यक्त केलं आहे. "माझे हृदय तुटले आहे. शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत अशा असह्य, अवर्णनीय वेदना आणि दुःखाने मी थरथर कापत आहे. करूरमध्ये ज्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या मनापासूनच्या शोकसंवेदना व्यक्त करतो. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सगळे  लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो," अशा शब्दात विजयने आपल्या भावना व्यक्त केल्या.

या दुर्घटनेनंतर तामिळनाडू सरकारने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने विजय याच्या करूर रॅलीतील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला आहे. तर चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी तात्काळ एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्याची घोषणा तामिळनाडू सरकारने केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश अरुणा जगदीसन या आयोगाच्या अध्यक्ष असतील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Actor Vijay leaves city after 36 die in rally stampede.

Web Summary : Thirty-six died in a stampede at actor Vijay's Tamil Nadu rally. Vijay expressed grief, offering condolences. The government announced compensation for victims' families and those injured. An inquiry has been ordered into the incident.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूStampedeचेंगराचेंगरीAccidentअपघात