VIDEO: मोबाईल बदलून दिला नाही म्हणून महिलेची शोरुममध्ये तोडफोड
By Admin | Updated: February 22, 2017 17:54 IST2017-02-22T17:54:08+5:302017-02-22T17:54:22+5:30
मोबाईल बदलून दिला नाही म्हणून एक महिला आणि दोन मुलींनी शोरूमची तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

VIDEO: मोबाईल बदलून दिला नाही म्हणून महिलेची शोरुममध्ये तोडफोड
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - मोबाईल बदलून दिला नाही म्हणून एक महिला आणि दोन मुलींनी शोरूमची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली असून सीसीटीव्हीमध्ये ही सर्व घटना कैद झाली आहे. दिल्लीच्या राजौरी गार्डनमध्ये 20 फेब्रुवारीला ही घटना घडली.
5 महिन्यांपूर्वी त्या महिलेने सॅमसंगचा फोन आणि त्या फोनचा विमा खरेदी केला होता. मात्र तो फोन व्यवस्थित काम करत नसल्याची त्यांची तक्रार होती. संबंधित महिला विमा कंपनीच्या पत्त्यावर गेली, मात्र त्याठिकाणी तिला कोणतंही ऑफिस मिळालं नाही. त्यामुळे ती महिला संतापली, त्यातच शोरुममधील कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महिला आणि तिच्या मुलीने दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली.
आमच्या शोरुममध्ये फोन दुरुस्त केला जात नाही, असे आम्ही त्यांना अनेकदा सांगितले . मात्र, त्यांनी आमचे ऐकले नाही. त्यांनी दुकानात गोंधळ घालत काचा फोडल्या आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली,’ असं शोरूमचे मालक रिकी कोहली म्हणाले. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस त्या महिलांचा शोध घेत आहेत.
#WATCH: Three women created ruckus, vandalised a mobile phone store in Rajouri Garden, Delhi (20/02/17). pic.twitter.com/6ytJ3QzGnS
— ANI (@ANI_news) February 22, 2017