VIDEO: संपूर्ण देश जवानांच्या पाठिशी - विराट कोहली

By Admin | Updated: October 28, 2016 12:47 IST2016-10-28T12:22:48+5:302016-10-28T12:47:08+5:30

क्रिकेटर विराट कोहलीने भारतीय लष्कराला दिवाळीच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

VIDEO: The whole country's soldiers - Virat Kohli | VIDEO: संपूर्ण देश जवानांच्या पाठिशी - विराट कोहली

VIDEO: संपूर्ण देश जवानांच्या पाठिशी - विराट कोहली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - क्रिकेटर विराट कोहलीने भारतीय लष्कराला दिवाळीच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सणाच्या दिवशीही आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून देशाचे संरक्षण करणा-या सैनिकांप्रती विराट कोहलीने व्हिडीओद्वारे कृतज्ञता व्यक्ती केली आहे. 
 
'घरापासून दूर राहणे खूप कठीण असते. ज्याप्रकारे तुम्ही देशाचे रक्षण करत आहात, ही बाब कौतुकास्पद आहे.  मी आणि संपूर्ण देश तुमच्या नेहमी पाठिशी आहोत, जय हिंद', असे सांगत विराटने भारतीय लष्करातील जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी बातम्या 
सोबत त्याने, 'जेव्हा कधी तुम्ही जवानांना पहाल, तेव्हा त्यांना सलाम करा. आपण सुरक्षित आहोत आणि सण साजरे करत आहोत, ते फक्त जवानांमुळे. जय हिंद'.  विराटने  हॅश टॅग संदेश टू सोल्जर्स (#Sandesh2Soldiers ) वापरत या संदेशसहीत व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  


Web Title: VIDEO: The whole country's soldiers - Virat Kohli