VIDEO : थरार ! जेव्हा सिंह घेरतात सफारी कारला...
By Admin | Updated: February 2, 2017 10:28 IST2017-02-02T08:49:22+5:302017-02-02T10:28:49+5:30
बान्नेरघाट बायोलॉजिकल पार्कमधील सफारीदरम्यान पर्यटकांच्या एका समुहाला थरारक अनुभव आला.

VIDEO : थरार ! जेव्हा सिंह घेरतात सफारी कारला...
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 2 - बान्नेरघाट बायोलॉजिकल पार्कमधील सफारीदरम्यान पर्यटकांच्या एका समुहाला थरारक अनुभव आला. सफारी करत असताना या पर्यटकांच्या कारला चक्क सिंह आणि सिंहिणीने घेरले. यावेळी सिंहाने तर थेट कारवरच चढण्याचा प्रयत्न केला. साहजिकच पर्यटकांच्या चांगलीच घाबरगुंडी उडाली. मात्र कारचालकाने मोठ्या शिताफीने गाडी हळू पुढे नेली आणि त्यांच्या तावडीतून सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हे थरारक दृश्य कॅमे-यामध्ये कैद झाले आहे. हा व्हिडीओ सफारी करणा-या दुस-या पर्यटकाने काढला आहे. सोशल मीडियावर थरारक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे बान्नेरघाट पार्कमधील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.