शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Video: काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच फॉर्म्युला-4 रेसिंगचा थरार, प्रेक्षकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 16:52 IST

श्रीनगरमधील डल तलावाशेजारी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Srinagar Formula 4 Race Video: गेल्या काही वर्षांमध्ये कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरच्या खोऱ्यातील परिस्थिती बदलली आहे. राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास होण्यासोबतच पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काश्मीरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच फॉर्म्युला-4 कार रेसिंगचे आयोजन करण्यात आले. येथील बुलेवर्ड रोडवर या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या फॉर्म्युला-4 कार रेसिंगमध्ये प्रसिद्ध फॉर्म्युला चालकांनी सहभाग नोंदवला. काश्मीरमधील अॅडव्हेंचर टूरिझमला चालना देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुलेवर्ड रोडवर हा थरारक शो पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. दल सरोवराजवळ 1.7 किमीच्या रस्त्यावर ही अनोखी रेस आणि विविध थरारक स्टंट्सही पाहायला मिळाले. काश्मीरच्या पर्यटन विभागाने फॉर्म्युला-4 आणि इंडियन रेसिंग लीगच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या कार्यक्रमाची पोस्ट शेअर केली. ते म्हणाले, हे पाहून खूप आनंद होतोय. यामुळे जम्मू-काश्मीरचे सौंदर्य आणखी लोकांपर्यंत पोहचवण्यास मदत होईल. मोटारस्पोर्ट्सच्या भरभराटीसाठी भारत उत्तम संधी देतो आणि श्रीनगर हे यासाठी अगदी योग्य ठिकाणी आहे. 

काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी श्रीनगरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करणे, ही एक मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले. काश्मीर पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि खोऱ्यातील तरुणांमध्ये मोटर स्पोर्ट्सची आवड निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. गेल्या अनेक दशकांपासून संघर्षाने ग्रासलेल्या राज्यात फॉर्म्युला 4 आशेचा किरण म्हणून काम करेल. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcarकारAutomobileवाहनArticle 370कलम 370BJPभाजपा