तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात अभिनेता थलपती विजयच्या रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे देशभरात शोककळा पसरली आहे. चेंगराचेंगरीत ३८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जीव गमावलेल्यांमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. रुग्णालयात मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहायला मिळत आहे.
तामिळनाडूचे शिक्षण मंत्री अंबिल महेश पोय्यामोझी यांना देखील या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. रुग्णालयातील भयंकर परिस्थिती पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात झालेल्या चेंगराचेंगरीने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे.
अंबिल महेश पोय्यामोझी या दुःखद घटनेनंतर रुग्णालयात दाखल झाले. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे, लहान मुलांचे मृतदेह पाहून ते हादरले, ढसाढसा रडले. "आयोजकांना वारंवार नियमांचं पालन करण्यास सांगितलं जात होतं" असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्यासोबत उभे असलेले सेंथिल बालाजी यांनाही या दुर्घटनेचा मोठा धक्का बसला.
तामिळनाडूतील करूर जिल्ह्यात थलपती विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १० मुलं आणि १६ महिलांचा समावेश आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
Web Summary : A stampede at actor Vijay's rally in Tamil Nadu's Karur killed 38, including children and women. Tamil Nadu's Education Minister Anbil Mahesh Poyyamozhi broke down seeing the deceased at the hospital. Organizers were repeatedly told to follow rules, he said.
Web Summary : तमिलनाडु के करूर में अभिनेता विजय की रैली में भगदड़ से 38 लोगों की मौत हो गई, जिनमें बच्चे और महिलाएं शामिल हैं। मृतकों को देखकर तमिलनाडु के शिक्षा मंत्री अंबिल महेश पोय्यामोझी अस्पताल में रो पड़े। आयोजकों को नियमों का पालन करने के लिए बार-बार कहा गया था।