शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Video: भारताकडे अभेद्य शक्ती! DRDO ला मोठे यश; हाइपरसोनिक मिसाईलची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 17:24 IST

भारताकडे आता हायपरसोनिक मिसाईल विकसित करण्याची क्षमता आलेली आहे. डीआरडीओ पुढील पाच वर्षांत स्क्रॅमजेट इंजिनासह हे मिसाईल तयार करू शकणार आहे.

नवी दिल्ली : भारतान हायपरसोनिक मिसाईल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौछा असा देश बनला आहे ज्याच्याकडे स्वत:चे हाइपरसोनिक तंत्रज्ञान आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनाइजेशन (DRDO) ने ओडिशाच्या बालासोरमध्ये हायपरसोनिक तंत्रज्ञानाच्या डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल HSTDV टेस्ट यशस्वी पूर्ण केली आहे. हे मिसाईलच असून हवेत आवाजाच्या ६ पट वेगाने अंतर कापते. म्हणजेच दुष्मनाच्या एअर डिफेन्स सिस्टिमला या मिसाईलचा मागमूसही लागणार नाही. 

भारताकडे आता हायपरसोनिक मिसाईल विकसित करण्याची क्षमता आलेली आहे. डीआरडीओ पुढील पाच वर्षांत स्क्रॅमजेट इंजिनासह हे मिसाईल तयार करू शकणार आहे. या मिसाईलचा वेग एवढा प्रचंड आहे की, सेकंदात हे मिसाईल दोन किमीचे अंतर कापणार आहे. महत्वाचे म्हणजे हे तंत्रज्ञान दोन्ही उद्देशांसाठी वापरता येणार आहे. युद्ध आणि अंतराळात सॅटेलाईट पाठविण्यासाठी देखील. अंतराळात वेगाने आणि कमी खर्चात सॅटेलाईट पाठविता येणार आहेत. याशिवाय भारताचे ब्राम्होस-२ हे खतरनाक मिसाईल बनविण्यासही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. सध्या डीआरडीओ आणि रशियाची एजन्सी हे ब्राम्होस-२ बनवित आहेत. 

या मिसाईलचा वेग एवढा असतो की, जर हे मिसाईल भारतातून डागण्यात आले तर जगातील कोणत्याही देशाला तासाभरात उद्ध्वस्त करता येणार आहे. सामान्य मिसाईल बॅलेस्टिक ट्रॅजेक्टरीचे पालन करतात. यामुळे त्यांना आरामात ट्रॅक करता येते. यामुळे दुष्मनालाही त्या मिसाईलवर वार करण्याची संधी मिळते. तर हायपरसोनिक मिसाईल कोणत्याही ठरवून दिलेल्या मार्गाने जात नाही. ते अमेरिकेच्या दिशेने जाऊन थेट चीनवरही आदळू शकते. वेग एवढा असणार की एअर डिफेन्स सिस्टिमही यासमोर फेल ठरणार आहे. 

 

रशियाकडे सर्वात खतरनाक मिसाईलहायपरसोनिक मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षा (1235 किमी) कमीत कमी ५ पटींनी जास्त वेगाने जाऊ शकते. म्हणजेच 6174 प्रति तास वेग. या मिसाईलमध्ये क्रूझ आणि बॅलिस्टिक मिसाईल या दोन्हींचे गुण आहेत. हे मिसाईल लाँच झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणार आहे. त्यानंतर तेथून अंतर कापत लक्ष्याकडे झेपावणार आहे. यामुळे या मिसाईलला रोखणे कठीण असणार आहे. वेगही प्रचंड असल्याने सध्याचे रडार या मिसाईलला शोधण्यात कुचकामी ठरणार आहेत. या मिसाईलच्या वेगामुळे अमेरिकेसह चीनलाही धडकी भरली आहे. अमेरिकेच्या पेटागॉननुसार ते हाय़परसोनिक मिसाईलवर काम करत आहेत. तर चीनने हायपरसोनिक हत्याराचे 2014 मध्येच टेस्टिंग केले आहे. या मिसाईलची धक्कादायक बाब म्हणजे हे मिसाईल तब्बल दोन अब्ज किलो अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. यामुळे एखादा मोठा देश काही क्षणांत बेचिराख होऊ शकतो. या मिसाईलच्या टप्प्यात अमेरिकाही येते. 2018 मध्ये या मिसाईलची टेस्टिंग करण्यात आली होती. तेव्हा 6000 किमीवरील लक्ष्यभेद करण्यात आला होता. 

महत्वाच्या बातम्या...

Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव

Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर

"7 रुपयांत 100 किमी"! हैदराबादच्या कंपनीने अ‍ॅटम बॉम्बच फोडला; मोटरसायकलची किंमत 50 हजार

टॅग्स :DRDOडीआरडीओindia china faceoffभारत-चीन तणाव