VIDEO : प्रियंका गांधींहून भाजपाचे स्टार प्रचारक सुंदर - विनय कटियार

By Admin | Updated: January 25, 2017 15:06 IST2017-01-25T13:29:32+5:302017-01-25T15:06:57+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते विनय कटियार यांनी प्रियंका गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

VIDEO: The star campaigner of Priyanka Gandhi from BJP - Vinay Katiyar | VIDEO : प्रियंका गांधींहून भाजपाचे स्टार प्रचारक सुंदर - विनय कटियार

VIDEO : प्रियंका गांधींहून भाजपाचे स्टार प्रचारक सुंदर - विनय कटियार

 ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 25 - भाजपाचे ज्येष्ठ नेते विनय कटियार यांनी प्रियंका गांधी यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'प्रियंका गांधी कोणी कलाकार नाही, त्या एवढ्याही सुंदरही नाहीत, जेवढा त्याचा प्रचार केला जात आहे. आमच्या पक्षात स्मृती इराणी जास्त सुंदर आहेत, त्या प्रियंका गांधींहून अधिक गर्दी खेचू शकतात', असे वादग्रस्त विधान कटियार यांनी केले आहे. 
 
प्रियंका गांधींबाबत वादग्रस्त विधान करण्याची कटियार यांची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण केला होता. दरम्यान, कटियार यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने केली आहे. तर दुसरीकडे चौफेर टीका होऊ लागल्यानंतर कटियार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. प्रियंका गांधी सुंदर असल्याने काँग्रेसने त्यांना स्टार प्रचारक नेमले आहे का?, असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर मी त्यावर उत्तर दिले, असे त्यांनी सांगितले. (बेटी की इज्जत से व्होट की इज्जत बडी है - शरद यादवांची मुक्ताफळे)

 
 

Web Title: VIDEO: The star campaigner of Priyanka Gandhi from BJP - Vinay Katiyar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.