शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
3
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
4
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
5
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
6
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
7
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
8
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
9
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
10
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
11
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
12
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
13
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
14
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
15
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
16
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
17
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
18
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
19
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
20
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 

Video: ब्रिटीश संसदेत मोदींविरुद्ध भाषण, राष्ट्रवादीने शेअर केला व्हिडिओ; भाजपचाही पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 20:38 IST

भारतात सध्या सुरू असलेल्या धर्मांध राजकारणाविषयी चिंता व्यक्त करताना गुजरात दंगलींचा दाखला सईदा वारसी यांनी दिला

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. एका ब्रिटीश खासदाराच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीने मोदींना लक्ष्य केलं आहे. ब्रिटीश खासदार आणि वकील सईदा वारसी यांनी नुकत्याच हाऊस ऑफ लॉर्ड्स या ब्रिटीश संसदेच्या वरिष्ठ सदनात पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोदी नीती ही भारताच्या विकासासाठी सही नीती नसल्याचे सूतोवाच त्यांनी आपल्या या भाषणातून केले आहे. तसेच, देशातील धार्मिक वातावरणावरही त्यांनी भाष्य केलंय.

भारतात सध्या सुरू असलेल्या धर्मांध राजकारणाविषयी चिंता व्यक्त करताना गुजरात दंगलींचा दाखला सईदा वारसी यांनी दिला. गुजरातमध्ये २००२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे पाहिले तेच आता आम्ही पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये पाहत आहोत, असे त्यांनी म्हटलं आहे. तसेच, हे अत्यंत दुःखद आहे.  मोदी म्हणजे भारत नाही आणि मोदीजी मांडत असलेली संकल्पना ही महात्मा गांधीजींची भारताची संकल्पना नाही. धार्मिक विखार आणि हिंसक विचार पेरणारी विचारसरणी म्हणजे हिंदू धर्म आणि हिंदुत्व नाही, अशी टीकाही सईदा यांनी यावेळी संसदेतील भाषणात केली आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत अकाऊंटवरुन खासदार त्यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आता, या व्हिडिओला भाजपनेही प्रत्युत्तर दिलंय. भाजपने या व्हिडिओतील खासदारांचे कनेक्शन थेट पाकिस्तानशी जोडले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भारताच्या न्यायव्यवस्थेपेक्षा जास्त विश्वास मुळच्या पाकिस्तानी वंशाच्या असणाऱ्या परदेशी खासदारांवर आहे का?, असा प्रतिसवाल भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे. तसेच, देशाच्या पंतप्रधानांवर होणाऱ्या खोट्या आरोपांचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचीच शरद पवार यांची शिकवण आहे का?, असेही त्यांनी म्हटले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाMember of parliamentखासदारNCPराष्ट्रवादी काँग्रेस