VIDEO - माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर छापा, जुन्या नोटांमध्ये सापडले 40 कोटी

By Admin | Updated: April 14, 2017 16:09 IST2017-04-14T15:48:54+5:302017-04-14T16:09:10+5:30

बंगळुरु पोलिसांना शुक्रवारी माजी नगरसेवक व्ही. नागराज यांच्या कार्यालयावर मारलेल्या छाप्यामध्ये जुन्या नोटांचे घबाड सापडले.

VIDEO - Printed on former corporator's office, found 40 million in old notes | VIDEO - माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर छापा, जुन्या नोटांमध्ये सापडले 40 कोटी

VIDEO - माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर छापा, जुन्या नोटांमध्ये सापडले 40 कोटी

 ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. 14 - बंगळुरु पोलिसांना शुक्रवारी माजी नगरसेवक व्ही. नागराज यांच्या कार्यालयावर मारलेल्या छाप्यामध्ये जुन्या नोटांचे घबाड सापडले. पोलिसांनी या छाप्यामध्ये 500 आणि 1 हजार रुपयांच्या जुन्या नोटांची बंडले जप्त केली. ही रक्कम 40 कोटींच्या घरात आहे. 
 
एएनआय वृत्तसंस्थेने या छाप्याचा व्हिडीओ प्रसारीत केला आहे. मागच्यावर्षी 8 नोव्हेंबर रोजी सरकारने 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. तेव्हापासून काळा पैसा शोधून काढण्यासाठी इन्कम टॅक्स खाते आणि राज्य पोलिसांकडून संशयितांच्या निवासस्थानी, कार्यालयांवर  धाड सत्राची कारवाई सुरु आहे. 
 
आयकर विभागाने ऑपरेशन क्लीन मनीच्या दुस-या टप्प्याला सुरुवात केली असून यावेळी 60 हजार लोक त्यांच्या रडारवर आहेत. या सर्वांची आयकर विभाग कसून चौकशी करणार आहे. नोटाबंदी निर्णय जाहीर झाल्यानंतर बाजारात आलेला काळा पैसा बाहेर काढण्याच्या हेतूने ऑपरेशन क्लीन मनी कारवाईला सुरुवात झाली आहे. ऑपरेशन क्लीन मनीच्या पहिल्या टप्प्यात नोटाबंदीदरम्यान संशयितरित्या आर्थिक व्यवहार करणा-या 18 लाख लोकांना नोटीस पाठवली होती. 

Web Title: VIDEO - Printed on former corporator's office, found 40 million in old notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.