शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Video: PM मोदींची IIT कानपूरला सरप्राईज व्हिसीट, इंजिनिअर्संचा घेतला क्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 18:31 IST

मोदींनी पदवीदान समारंभानंतर या सोहळ्यात उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी सरप्राईज व्हिसीट केली. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा असल्याने मोदींनी ही अचानक भेट दिली.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी पदवीदान समारंभासाठी आयआयटी कानपूरमध्ये गेले होते. येथील ५४ व्या पदवीदान समारंभामध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधानांनी देशाची धुरा आता तरुणांनी आपल्या खांद्यावर घ्यावी असं म्हटलं.

कानपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर वारंवार दिसून येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींचे युपी दौरे वाढले असून ते तेथील जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकतेच त्यांनी आयआयटी कानपूरला भेट देत. मोदींच्या सरप्राईज व्हिसीटमुळे कानपूर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही आश्चर्य वाटले. मोदींच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक भाजपा नेत्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत ही सरप्राईज व्हिसीट असल्याचं म्हटलंय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पदवीदान समारंभासाठी आयआयटी कानपूरमध्ये गेले होते. येथील ५४ व्या पदवीदान समारंभामध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधानांनी देशाची धुरा आता तरुणांनी आपल्या खांद्यावर घ्यावी असं म्हटलं. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषणही केलं. सरधोपट मार्ग सोडून आव्हानांचा स्वीकार करावा आणि येत्या २५ वर्षांमध्ये आपल्याला जसा देश पाहिजे आहे, त्यासाठी काम सुरू करावं असं आवाहनही भावी इंजिनिअर्संना केलं. देशघडणीच्या कार्यात आतापर्यंत आपण खूप वेळ वाया घालविला आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.  मोदींनी पदवीदान समारंभानंतर या सोहळ्यात उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी सरप्राईज व्हिसीट केली. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा असल्याने मोदींनी ही अचानक भेट दिली. यावेळी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही त्यांच्यासमवेत होते. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम असल्याने विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत होते. दरम्यान, भाजपा नेत्या प्रिती गांधी यांनी मोदींच्या या भेटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, ही सरप्राईज भेट असल्याचा दावाही त्यांनी केलाय. त्यावरुन, नेटीझन्सने त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKanpur IITकानपूर आयआयटीTwitterट्विटर