PM Modi Vantara Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वनतारा येथील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचं उद्घाटन केलं. वनतारा येथे दोन हजारांहून अधिक प्रजाती आहेत आणि दीड लाखाहून अधिक रेक्यू केलेल्या, जीव धोक्यात असलेल्या प्राण्यांचं ते हक्काचं ठिकाण आहे. पंतप्रधान मोदींनी वनताराला भेट दिली. त्या क्षणांचा एक अप्रतिम व्हिडीओ आता समोर आला आहे.
वनतारा येथे पंतप्रधान मोदी हे आशियाई सिंहाचा छावा आणि इतर प्राण्यांच्या प्रजातींच्या पिल्लांशी खेळताना दिसत आहेत. त्यांनी छाव्यांना कुशीत घेतलं, मायेने त्यांच्या अंगावरून हात फिरवला, बॉटलने दूध पाजलं आणि प्रेमाने भरवलं. मोदींनी ज्या पांढऱ्या रंगाच्या सिंहाच्या छाव्याला भरवलं त्याचा जन्म वनतारामध्येच झाला आहे. त्याच्या आईला रेस्क्यू करून वनतारामध्ये आणण्यात आलं.
नरेंद्र मोदींनी वनतारा येथील वन्यजीव रुग्णालयाला देखील भेट दिली आणि तेथील वन्य प्राण्यांवरील उपचारांच्या व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला. येथे प्राण्यांसाठी एमआरआय, सीटी स्कॅन, आयसीयू इत्यादींची व्यवस्था आहे. यासोबतच एनेस्थीसिया, कार्डियोलॉजी, नेफ्रोलॉजी, एंडोस्कोपीसारखे प्रत्येक विभाग आहेत. पंतप्रधानांनी रुग्णालयाच्या एमआरआय कक्षालाही भेट दिली. येथे एका आशियाई सिंहाचा एमआरआय केला जात होता. ते ऑपरेशन थिएटरमध्येही गेले. जिथे एका बिबट्यावर शस्त्रक्रिया सुरू होती, एका कारने धडक दिल्याने बिबट्या जखमी झाला आहे.
पंतप्रधानांनी वनतारात फेरफटका मारत निसर्गाचा आनंद घेतला. सिंह, बिबट्या, झेब्रा यासह अनेक प्राण्यांना पाहिलं धीरूभाई अंबानी संशोधन प्रयोगशाळेचीही पाहणी केली. हत्ती, जिराफ यांना प्रेमाने फळं खाऊ घातली. यानंतर ते पक्षी वॉर्डमध्ये पोहोचले. मोदींचा वनतारातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून तो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे.