शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

VIDEO: अहमदाबादमध्ये काँग्रेस आमदाराचं चपलांचा हार घालून केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 13:29 IST

अहमदाबादच्या स्थानिक आमदाराचं एका व्यक्तीने चपलांचा हार घालून स्वागत केल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देअहमदाबादच्या स्थानिक आमदाराचं एका व्यक्तीने चपलांचा हार घालून स्वागत केल्याची घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या दरियापूरचे आमदार गयासुद्दीन शेख बुधवारी शाहपूरला गेल्यावर तेथे एका व्यक्तीने त्याचं स्वागत चप्पल-बुटांचा हार घालून केलं.

अहमदाबाद- अहमदाबादच्या स्थानिक आमदाराचं एका व्यक्तीने चपलांचा हार घालून स्वागत केल्याची घटना समोर आली आहे. अहमदाबादच्या दरियापूरचे आमदार गयासुद्दीन शेख बुधवारी शाहपूरला गेल्यावर तेथे एका व्यक्तीने त्याचं स्वागत चप्पल-बुटांचा हार घालून केलं. बाईकवरून येणाऱ्या या आमदाराच्या गळ्यात आधीपासूनच फुलांच्या अनेक माळा घातलेल्या होत्या. त्याचवेळी तेथे पोहचलेल्या एका माणसाने आमदार गयासुद्दीन शेख यांच्या गळ्यात चपलांची माळ घातली. आमदार गयासुद्दीन शेख यांनी त्यांच्या मतदारसंघातून महागाई आणि भ्रष्टाचार विरोधात रॅली काढली होती. त्या रॅलीसाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. सादिक ताकळी नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचा दावा शेख यांनी केला आहे.

माझ्याबरोबर अशी काही घटना घडेल याचा अंदाज नसल्याचं आमदार गयासुद्दीन शेख यांनी सांगितलं. ज्या व्यक्तीने माझ्या गळ्यात चपलांचा हार घातला तो व्यक्ती झुगाराचा धंदा चालवायचं बेकायदेशीर काम करत होता. ते काम मी बंद पाडलं होतं, म्हणूनच त्याने हे कृत्य केलं असावं, असं आमदार गयासुद्दीन शेख यांनी म्हंटलं आहे. मला चपला-बुटांचा हार घालणार व्यक्ती माझ्या खूप जवळ होता, असंही ते पुढे म्हणाले. 

चपलांचा हार घालणारा व्यक्ती माझ्या मित्रासारखा होता. पण तो करत असलेल्या बेकायदेशीर कामाबद्दल मला माहिती मिळाल्यानंतर मी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. माझ्या तक्रारीनंतर त्याचे बेकायदेशीर धंदे बंद झाले, असं गयासुद्दीन शेख यांचं म्हणणं आहे. माझ्या विभागातील लोक दारू आणि झुगाराबद्दल असलेलं माझं मत जाणतात, असंही ते म्हणाले आहेत.

सादिक ताकळी या माझ्या विभागातील गुन्हेगार आहे. त्याचा अवैध दारूचा व्यवसाय असून त्या विरोधात मी आवाज उठवल्याने त्याने हे कृत्य केलं. अशा गुन्हेगारांची मला अजिबात भीती वाटत नाही. त्या रॅलीमध्ये शेकडो लोक माझ्यासाठी फुलं घेऊन आले होते, त्यामुळे एका व्यक्तीच्या वागण्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नसल्याचं आमदार गयासुद्दीन शेख यांनी सांगितलं.  गुजरातमध्ये भाजपा नगरसेवकाला स्थानिक लोकांनी झाडाला बांधून मारहाण केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना आहे.

संतापलेल्या लोकांनी भाजपा नेत्याला नेलं फरफटत, झाडाला बांधून केली मारहाणगुजरातमध्ये भाजपा नगरसेवकाला स्थानिक लोकांनी झाडाला बांधून मारहाण केल्याची घटना समोर आली. वडोदरा शहरातील बोपड येथे ही घटना घडली. झोपडपट्ट्यांवर कारवाई केल्याने संतप्त झालेल्या स्थानिकांनी सत्तेत असणा-या भाजपा नगरसेवक हसमुख पटेल यांना झाडाला बांधून मारहाण करत आपला संताप व्यक्त केला. हसमुख पटेल यांना झाडाला बांधल्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला असून यामध्ये लोक संताप व्यक्त करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये हसमुख पटेल यांचा पांढरा शर्ट फाटलेला दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी 70 जणांना अटक केली. 

 

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसMLAआमदार