व्हिडीओ - पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडा जाळला

By Admin | Updated: July 29, 2016 15:07 IST2016-07-29T14:35:59+5:302016-07-29T15:07:14+5:30

काश्मीरी जनता आपल्यासोबत आहे असा दावा करणा-या पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने सणसणीत चपराक दिली आहे.

Video - Pakistani flag is burnt in Pakistan-occupied Kashmir | व्हिडीओ - पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडा जाळला

व्हिडीओ - पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडा जाळला

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. २९ - काश्मीरी जनता आपल्यासोबत आहे असा दावा करणा-या पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने सणसणीत चपराक दिली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खो-यातील जनतेने नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा विरोध करताना पाकिस्तानी झेंडा जाळला. 
 
पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने पाकिस्तानी झेंडा जाळताना नवाझ शरीफ सरकार विरोधात घोषणा दिल्या. नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाने या निवडणुकीत विजय मिळवला. शरीफ यांच्या पीएलएल-एन पक्षाने ४१ पैकी ३१ जागांवर विजय मिळवला होता. 
 
मुस्लिम कॉन्फरन्स आणि पीपीपीने प्रत्येकी तीन जागांवर विजय मिळवला. २१ जुलैला झालेल्या निवडणुकीविरोधात नीलम खो-यात रहाणा-या जनतेने रस्त्यावर उतरुन निषेध केला. 

Web Title: Video - Pakistani flag is burnt in Pakistan-occupied Kashmir