Video: ओम पुरी यांचं "भूत" भटकतंय, पाक चॅनलने तोडले अकलेचे तारे
By Admin | Updated: April 17, 2017 21:29 IST2017-04-17T21:19:59+5:302017-04-17T21:29:54+5:30
अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करणा-या पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडले

Video: ओम पुरी यांचं "भूत" भटकतंय, पाक चॅनलने तोडले अकलेचे तारे
6 जानेवारी 2017 रोजी झाला होता मृत्यू-
भारदस्त आवाज, पल्लेदार संवादफेक आणि कसदार अभिनयाने रुपेरी पडद्यावर दीर्घकाळ आपली छाप उमटविणारा ओम पुरी नावाचा चंदेरी दुनियेचा लखलखता तारा 6 जानेवारी 2017 रोजी अचानक काळाच्या पडद्याआड लुप्त झाला. 6 जानेवारीला सकाळी हृदयविकाराने ओम पुरी यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी नंदिता आणि मुलगा ईशान असा परिवार आहे.‘घाशीराम कोतवाल’ या नाटकावर आधारित मराठी चित्रपटातून सुरू केलेल्या चंदेरी प्रवासात त्यांनी बॉलीवूडसोबतच हॉलीवूडपर्यंतचा टप्पा गाठला. देखण्या व्यक्तिमत्त्वाचे वरदान नसताना कसदार अभिनयाच्या जोरावर अर्धसत्य, आक्रोश यांसारखे चित्रपट, तमस, भारत एक खोज, कक्काजी कहीन आदी मालिकांमुळे ते घराघरांत पोहोचले.