शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

Video - पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, जनतेला धमकावून केली लाखोंची वसुली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 08:37 IST

निवडणूक हरल्यानंतर मतदारांकडून पैसे वसूल केल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. नीमच जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

नवी दिल्ली - निवडणुकीच्या आधी लोकांना पैशाचं अमिष दाखवलं जातं. वेगवगेळी प्रलोभनं देऊन त्यांच्याकडे मत मागितल्याचे अनेक व्हिडीओ हे याआधी समोर आले आहेत. पण असं असताना आता मध्य प्रदेशमधून एक अजब प्रकार समोर आला आहे. निवडणूक हरल्यानंतर मतदारांकडून पैसे वसूल केल्याचा अनोखा प्रकार समोर आला आहे. नीमच जिल्ह्यात ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरपंच पदाच्या मेदवाराविरोधीत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नीमच जिल्ह्यातील मनासा जनपदअंतर्गत ग्राम पंचायत देवरानमधील सरपंच पदाचे उमेदवार राजू दायमा यांचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक गावकऱ्यांच्या घराचं दार ठोकावून त्यांच्याकडून पैसे वसूल करताना दिसत आहे. काही जणांना मारहाण करण्यात आली तर काहींना धमकी देऊन पैसे वसूल करण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत आहे. 

 चश्मा या निवडणुकीच्या चिन्हाअंतर्गत निवडणूक लढवणाऱ्या दायमा यांनी पैसे वाटून मतदारांना प्रलोभन दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत दुसराच उमेदवार जिंकला. वीरेंद्र पाटीदार यांचा विजय झाला तर राजू दायमा यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर राजू आणि त्यांचे समर्थक संतापले. यानंतर गावात जाऊन मतदारांना धमकी देत त्यांच्याकडून पैसे वसूल करू लागले.

राजू दायमा आपल्या काही साथीदारांना घेऊन लोकांच्या घरी पोहोचले. तिथे त्यांच्यकडे जबरदस्तीने पैसे मागू लागले. काही लोकांना त्यांनी शिवीगाळ केली. तर काहींना धमकावलं. याचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अवघ्या  तासाभरात त्यांनी तब्बल चार लाख रुपये वसूल केले. व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची दखल घेत आरोपी राजू दायमाविरोधात मारहाण, धमकी देणे आदी गुन्हा दाखल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMONEYपैसाElectionनिवडणूक