शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Video: व्यासपीठावर 'वॉशिंग मशीन'सह दिसल्या ममता बॅनर्जी, काळा कपडा टाकून पाढरा काढला, भाजपवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 22:46 IST

यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यात काळे कपडे टाकून पांढरे कपडे काढले...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (29 मार्च) भाजपवर जोरदार निशाणा साधला. यासाठी त्यांनी एक अनोखा मार्ग अवलंबला. यावेळी त्यांनी वॉशिंग मशीनसह धरणे दिले. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसने व्यासपीठावर प्रतिकात्मक वॉशिंग मशीन लावले होते. याला त्यांनी भाजपचे वॉशिंग मशीन, असे नाव दिले होते. 

यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यात काळे कपडे टाकून पांढरे कपडे काढले. खरे तर, मुख्यमंत्री ममता आणि त्यांच्या पक्षाकडून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे की, 'भाजपच्या राजवटीत केंद्रीय एजन्सींकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास दिला जातो. मात्र ते भाजपमध्ये गेले की, निर्दोष ठरतात. यासंदर्भातील व्हिडिओही टीएमसीने ट्विट केला आहे. तसेच, ही 'भाजपच्या वॉशिंग मशीनची जादू' असल्याचेही यावेळी म्हणण्यात आले. यावेळी टीएमसी कार्यकर्त्यांनी 'वॉशिंग मशीन...भाजप' अशी घोषणाबाजीही केली.

भाजपवर CM ममतांचा निशाणा -माध्यमांतील वृत्तांनुसार, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात दोन दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केले आहेत. ममता बॅनर्जी म्हणाल्या, "भाजप वॉशिंग मशीन बनले आहे. चोर, दरोडेखोरांची यादी काढा, ते सगळे तिथे (भाजपमध्ये) बसले आहेत. मला संविधानाबद्दल त्यांचे प्रवचन ऐकायचे आहे?" सीएम ममता म्हणाल्या, "मला धरणे देण्याचा पूर्ण अधिकार आहे. गरज पडल्यास मी पंतप्रधानांच्या निवासस्थानीही धरणे देईन. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस