व्हिडीओ - जाहीर कार्यक्रमात 'तिने' कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन

By Admin | Updated: June 26, 2016 21:41 IST2016-06-26T17:01:48+5:302016-06-26T21:41:45+5:30

विविध कारणांमुळे चर्चेत रहाणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या पुन्हा एकदा विचित्र कारणासाठी चर्चेत आले आहेत.

Video - 'Kareena' Chief Minister's kiss in Karnataka | व्हिडीओ - जाहीर कार्यक्रमात 'तिने' कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन

व्हिडीओ - जाहीर कार्यक्रमात 'तिने' कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे घेतले चुंबन

ऑनलाइन लोकमत 

बंगळुरु, दि. २६ - विविध कारणांमुळे चर्चेत रहाणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या पुन्हा एकदा विचित्र कारणासाठी चर्चेत आले आहेत. रविवारी बंगळुरुमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान एका महिलेने सिद्धरमय्या यांच्या गालाचे चुंबन घेतले. गिरीजा श्रीनिवास असे या महिलेचे नाव आहे. 
 
चुंबन घेणारी सदर महिला चिकमंगळुरु जिल्ह्यातील तरीकेरे येथील तालुका पंचायत सदस्य आहे. रविवारी एका जाहीर कार्यक्रमात तिला सन्मानित केल्यानंतर तिने सर्वांसमक्ष मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या गालाचे चुंबन घेतले. सिद्धरमय्या ज्या कुरुबा समाजातून येतात त्या समाजाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
 
आणखी वाचा
कावळा बसला म्हणून मुख्यमंत्री सिद्धरमय्यांनी बदलली गाडी!
 
या घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना गिरीजा म्हणाली की, सिद्धरमय्या मला वडिलांसारखे आहेत. मी त्यांना अप्पाजी म्हणून बोलावते. माझ्या शालेय जीवनापासून मी त्यांची खूप मोठी चाहती आहे. 
 
मला त्यांना पहिल्यांदा भेटण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वत:वर नियंत्रण ठेवू शकली नाही व त्यांचे चुंबन घेतले. गिरीजा सिद्धरमय्या यांच्या वरुणा मतदारसंघातून येते. ती एका मंत्र्याची नातेवाईक असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


Web Title: Video - 'Kareena' Chief Minister's kiss in Karnataka