VIDEO- नवरदेव बसलेल्या घोडीची थेट विहिरीत उडी

By Admin | Updated: July 13, 2017 14:14 IST2017-07-13T14:10:47+5:302017-07-13T14:14:30+5:30

आवाजाने बिथरलेल्या घोडीने चक्क नवरदेवासह विहिरीत उडी घेतल्याचा प्रकार घडला आहे.

VIDEO: Jump straight into the well in Navarwade | VIDEO- नवरदेव बसलेल्या घोडीची थेट विहिरीत उडी

VIDEO- नवरदेव बसलेल्या घोडीची थेट विहिरीत उडी

ऑनलाइन लोकमत

गोंडा, दि. 13- लग्न घर म्हंटलं की घरात सगळीकडेच धामधूम असते. लग्नाचा तो दिवस एन्जॉय करण्यासाठी सगळेच जण खास तयारी करतात. लग्नाच्या वेळी बऱ्याच चांगल्या-वाईट घटनाही घडताना दिसतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. तेथिल एका घरात लग्नाच्या काही वेळ आधी एक प्रसंग घडला. नवरदेव लग्नच्या मांडवात जाण्यासाठी तयार झाला होता. तसंच मुंडावळ्या बांधून तो घोडीवरही स्वार झाला होता. वाजत गाजत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत वरात निघाली होती. पण त्यावेळी फटाक्यांच्या आवाजाने बिथरलेल्या घोडीने चक्क नवरदेवासह विहिरीत उडी घेतल्याचा प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा गावात हा सगळा प्रकार घडला.
आणखी वाचा
 

कारागृहात शशिकलांचा व्हीआयपी थाट, 2 कोटींची लाच दिल्याचा आरोप

चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार करतोय खास मिसाईल

भारताच्या तुलनेत पाक खेळाडूंचे मानधन तुटपुंजे

खरंतर नवरदेवाने घोडीवर बसून घरासमोर विहिरीला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा उत्तर प्रदेशमध्ये आहे. तेथिल गोंडा इथल्या गावात या प्रथेनुसार नवरदेव घोडीवर बसून विहिरीला प्रदक्षिणा घालत होता. यावेळी फटाक्यांच्या आवाजाने घोडी बिथरली आणि घोडीने नवरदेवाला घेऊन थेट विहिरीत उडी घेतली. घटनेनंतर त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेळातच चिंतेमध्ये बदलला होता. त्यानंतर नवरदेवाला लगेचच दोरखंडाने बाहेर काढण्यात आलं. तर घोडीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशिनची मदत घेतली होती.  पण विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेत नवरदेवाला आणि घोडीला कोणतीही दुखापत झाली नाही. 

एएनआय वृत्तसंस्थेने घोडीला विहीरीतून बाहेर काढतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. जेसीबीच्या साहाय्याने घोडीला बाहेर काढण्यात आलं. तेथिल परिस्थिती निवळल्यानंतर वरात पुन्हा एकदा सुरू झाली.  
 

Web Title: VIDEO: Jump straight into the well in Navarwade