शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:56 IST

अलीकडेच त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून बिहार विधानसभा निवडणुकीत अलीनगर मतदारसंघातून उमेदवार म्हणून रिंगणात आहे. 

पटना - बिहारमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. दोन टप्प्यात याठिकाणी मतदान होणार आहे. त्यानंतर १४ नोव्हेंबरला बिहारचा निकाल जाहीर होईल. त्याआधी सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार प्रचारात गुंग आहेत. त्यातच भाजपा उमेदवार मैथिली ठाकूर यांच्या मुलाखतीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. या मुलाखतीत ब्ल्यू प्रिंटबाबत मैथिली ठाकूर यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून लोकांनी ट्रोल केले आहे.

बिहारमध्ये उद्योग येत नाही, ज्या कंपन्या आहेत त्या बंद पडतायेत. बिहारमधून स्थलांतरण मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या २० वर्षात स्थलांतरण बंद झाले नाही मग ५ वर्षात कसं होईल असा प्रश्न पत्रकाराने भाजपा उमेदवार मैथिली ठाकूर यांना विचारला होता. तेव्हा ५ वर्ष पाहा, त्यानंतर हा प्रश्न विचारा असं मैथिली यांनी म्हटलं. त्यावर तुमची ब्ल्यू प्रिंट काय आहे असा प्रतिप्रश्न मुलाखत घेणाऱ्याने विचारला. त्यावर ब्ल्यू प्रिंट मी कॅमेऱ्यावर कशी सांगू शकते, ती खूप वैयक्तिक बाब आहे असं उत्तर मैथिली यांनी दिले. मुलाखतीतील हा भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

तसेच सगळीकडे जाहिरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात प्रत्येक गोष्टीचा उल्लेख आहे. ब्ल्यू प्रिंटबाबत बोलाल तर ते आम्ही अंमलात कसे आणणार हे आम्ही आता सांगू शकत नाही. जेव्हा ते अंमलात येईल तेव्हा सगळ्यांना दिसेल. स्थलांतर आणि रोजगार याचे कनेक्शन पाहिले तर प्रत्येक घरात सरकारी नोकरी देणे प्रॅक्टिकल नाही. सध्या पक्षात धोरणांबाबत बोलले जात आहे ते मी समजून घेत आहे. अनेक उद्योजक आहेत ते आमच्या पक्षाचे सरकार आल्यानंतर राज्यात गुंतवणूक करण्यासाठी थांबले आहेत. मी एक युवा आहे. काय काय गोष्टी येणार आहेत त्या मला माहिती आहेत. त्यामुळे ५ वर्ष विश्वास ठेवा असंही मैथिली ठाकूर यांनी म्हटलं.

कोण आहे मैथिली ठाकूर?

२५ जुलै २००० साली बिहारच्या मधुबनी येथे जन्मलेली मैथिली ठाकूर एक लोकप्रिय शास्त्रीय गायिका आहे. आजोबांपासून वडिलांपर्यंत तिने भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. २०१७ साली गाण्याच्या रियालिटी शोमध्ये ती रनर अप बनली होती. सोशल मीडियावर त्यांचे फॅन फोलोईंग भरपूर आहेत. अलीकडेच त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून बिहार विधानसभा निवडणुकीत अलीनगर मतदारसंघातून उमेदवार म्हणून रिंगणात आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Candidate's 'Personal' Blueprint Answer Goes Viral in Bihar Election

Web Summary : BJP candidate Maithili Thakur's ambiguous response about her 'blueprint' for Bihar's development has sparked controversy. When questioned about addressing migration and unemployment, she stated her plans were too 'personal' to reveal on camera, drawing criticism and varied reactions online.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपा