व्हिडिओ - हिंदू सेनेने साजरा केला डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस

By Admin | Updated: June 14, 2016 16:29 IST2016-06-14T16:20:10+5:302016-06-14T16:29:26+5:30

डोनाल्ड ट्रम्प यांचा आज वाढदिवस आहे, नवी दिल्लीमध्ये हिंदु सेनेने त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Video - Hindu Sena celebrates Donald Trump's birthday | व्हिडिओ - हिंदू सेनेने साजरा केला डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस

व्हिडिओ - हिंदू सेनेने साजरा केला डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा आज वाढदिवस आहे, नवी दिल्लीमध्ये हिंदु सेनेने त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लीम कट्टरतावाद्यांवर सातत्याने टिका केली आहे. ओरलँडो येथील गे नाइट क्लबवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सलग ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं मत मांडलं आहे.
 
ट्रम्प यांच्या मुस्लिम  विरोधी भूमिकेचे स्वागत करत हिंदु सेनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रम्प यांचा वाढदिवस साजरा केला. ट्रम्प आमचे हिरो आहेत तेच जगातील (इस्लामिक) दहशतवाद्यांपासुन देशाला वाचवू शकतील असा विश्वास हिंदु सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
'ओरलँडोमध्ये जे झालं ही सुरुवात आहे. आपलं नेतृत्व कमकुवत आणि कुचकामी आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी कट्टर इस्लामी देशांमधील नागरिकांच्या प्रवेशावर तात्पुरती बंदी आणणं गरजेच असल्याचं मी माझ्या अगोदरच्या भाषणात म्हटलं आहे', असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी ओरलँडो येथील गे नाइट क्लबवर झालेल्या हल्ल्यानंतर केलं होतं.  
 

Web Title: Video - Hindu Sena celebrates Donald Trump's birthday