VIDEO - बिहारमध्ये गुंडाराज सुरुच, भरदिवसा विद्यार्थ्यांचं अपहरण
By Admin | Updated: June 9, 2016 16:17 IST2016-06-09T13:40:30+5:302016-06-09T16:17:23+5:30
बिहारमध्ये भरदिवसा विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आल्याने कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आ

VIDEO - बिहारमध्ये गुंडाराज सुरुच, भरदिवसा विद्यार्थ्यांचं अपहरण
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 09 - बिहारमधील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नुकत्याच समोर आलेल्या धक्कादायक घटनेत भरदिवसा विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं. 7 जूनला हे अपहरण करण्यात आलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. पण यामुळे बिहारमधील कायदा सुव्यवस्था अजूनही सुधारली नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
बिहारमध्ये जेडीयू-आरजेडी सरकार सत्तेत आल्यापासून कायदा-सुव्यवस्था गंभीर विषय बनला आहे. विरोधकांनी जंगल राज आल्याचा वारंवार आरोप केला आहे. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सर्व आरोपांचं खंडन करत गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा केला होता. मात्र या घटनेमुळे परिस्थिती गंभीर आहे हेच दिसत आहे.