VIDEO: पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरुन मित्राची निर्घृणपणे हत्या
By Admin | Updated: August 2, 2016 14:59 IST2016-08-02T14:28:47+5:302016-08-02T14:59:11+5:30
पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरुन मित्राची डोक्यावर वार करुन निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना ओडिशामध्ये घडली आहे
VIDEO: पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरुन मित्राची निर्घृणपणे हत्या
ऑनलाइन लोकमत -
भुवनेश्वर, दि. 02 - पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरुन मित्राची डोक्यावर वार करुन निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना ओडिशामध्ये घडली आहे. नायापल्ली परिसरात ही घटना घडली. हा थरारक हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, यामध्ये आरोपी लाकडी दांडक्याने मित्राच्या डोक्यावर वार करताना दिसत आहे. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मित्रावरही त्याने हल्ला केला आहे.
आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची ओळख पटली आहे. सीमांचल जेना असं या आरोपीचं नाव आहे. ज्याच्यावर हल्ला केला तो बसंत प्रधान याचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मित्र लंबोदर प्रधान या हल्ल्यात जबर जखमी झाला आहे. दोघेही पीडित गंजम जिल्ह्याचे आहेत.
पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी सीमांचल जेनाला अटक केली आहे. सीमांचल जेना आणि त्याच्या पत्नीमध्ये होणा-या वादात बसंत प्रधान मध्यस्थी करत असे अशी माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. आपल्या पत्नीशी बसंतचे अफेअर असल्याच्या संशयातूनच त्याने हा हल्ला केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.