शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Video - बिहारमध्ये लोकमान्य टिळक ट्रेनला आग; लोकांनी बोगीतून उडी मारून वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 17:20 IST

होळी स्पेशल ट्रेन दानापूरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती. रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही वेळातच ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागली.

बिहारच्या आरा येथे लोकमान्य टिळक होळी स्पेशल ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारून आपला जीव वाचवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रेनच्या एसी बोगीमध्ये आग लागली. बिहारमधील भोजपूर अंतर्गत दानापूर-पंडित दीनदयाल उपाध्याय रेल्वे सेक्शनच्या कारिसाथ स्टेशनजवळ ही घटना घडली. होळी स्पेशल ट्रेनला आग लागली.

ट्रेनच्या एसी बोगीला आग लागली होती. 01410 ही होळी स्पेशल ट्रेन दानापूरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती. रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही वेळातच ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागली. ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या खूपच कमी होती, त्यामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर येत आहे. 

या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. मेन लाईनला लागलेल्या आगीमुळे अनेक ट्रेनच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मात्र, बोगी ट्रेनपासून वेगळी करून होळी स्पेशल ट्रेन रवाना करण्यात आली आहे. 

डीआरएम जयंत कुमार, पीएससीओ प्रभात कुमार, आरपीएफ आयजी अमरेश कुमार, वरिष्ठ डीसीएम सरस्वती चंद्रा, आरपीएफ कमांडंट पीके पांडा, वरिष्ठ डीएम-3 संतोष कुमार यांच्यासह अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. या आगीचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. 

 

टॅग्स :Biharबिहारfireआग