नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत छठपूजेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी ‘खोटी यमुना’ तयार केल्याचा दावा आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. भारद्वाज म्हणतात की, पंतप्रधानांसाठी वजीराबादमधून पाईपद्वारे स्वच्छ पाणी आणून कृत्रिम घाट तयार केला जात आहे.
काय म्हणाले सौरभ भारद्वाज ?
सौरभ भारद्वाज यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यातून त्यांनी पीएम मोदींसाठी बनावट यमुना तयार केल्याचा दावा केलाय. सौरभ म्हणतात, “पूर्वांचलच्या गरीब लोकांसाठी यमुना प्रदूषित आहे, पण पंतप्रधान मोदींसाठी फिल्टर केलेले साफ पाणी आणून बनावट घाट तयार केला जातोय. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व करण्यात येत आहे.”
“या कृत्रिम वासुदेव घाटावर पीएम मोदी डुबकी घेण्यासाठी जातील. मात्र, हे सर्व गरीबांच्या हितासाठी नव्हे, तर राजकीय फायद्यासाठी केले जात आहे. भाजप सरकारने यमुना स्वच्छ असल्याचा खोटा दावा केला. प्रत्यक्षात त्यांनी फक्त केमिकल टाकून फेस हटवला, यमुना अजूनही अस्वच्छच आहे. DPCC रिपोर्टनुसार, हे पाणी अंघोळीयोग्यही नाही. आमच्या सरकारने जेव्हा केमिकल टाकले होते, तेव्हा भाजप विरोध करत होती, पण आता ते हेच काम करत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
भाजपची प्रतिक्रिया
भाजप प्रवक्ता परवीन शंकर कपूर यांनी या आरोपाला प्रतिक्रिया देत म्हटले की, “सौरभ भारद्वाज यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली. ‘खोदा पहाड, निकली चुहिया’ अशीच त्यांची अवस्था आहे. रेखा गुप्ता सरकारने यमुना घाटावर स्वच्छ पूजास्थळ तयार केले, आता आप त्या विरोधात राजकीय वक्तव्ये करत आहेत. आपने 10 वर्षे सत्ता सत्तेत असताना पूर्वांचल च्या लोकांसाठी छठ पूजा घाटावरील सुविधा निर्माण केली नाहीत, आता जे सुधारणा केली जात आहेत, त्यावर टीका करत आहेत.”
Web Summary : AAP claims Modi was shown a 'fake Yamuna' for Chhath Puja using clean water piped in, while the poor use polluted water. BJP denies this, saying AAP failed to improve ghats during their tenure.
Web Summary : आप का दावा है कि मोदी को छठ पूजा के लिए पाइप से साफ पानी लाकर 'नकली यमुना' दिखाई गई, जबकि गरीब प्रदूषित पानी का उपयोग करते हैं। भाजपा ने इसका खंडन किया और कहा कि आप अपने कार्यकाल में घाटों को सुधारने में विफल रही।