शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video: टोलनाक्यावर डंपरने गाड्यांना चिरडले, दोन ठार; अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 16:12 IST

Dumper Accident: टोलनाक्यावर अनेक कार रांगेमध्ये उभ्या असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या डंपर त्यांना चिरडत गेला. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

Accident Video: एक भयंकर दुर्घटना समोर आली आहे. घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, एका भरधाव डंपरने टोलनाक्यावर रांगेत असलेल्या काही गाड्यांना अक्षरशः चिरडले. डेहरादून-हरिद्वार राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला आहे. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

डेहरादून-हरिद्वार महामार्गावरील लच्छीवाला टोलनाक्यावर हा भयंकर अपघात घडला. अनियंत्रित झालेल्या डंपरने अनेक कारला जोराची धडक दिली. यात सगळ्यात शेवटी असलेल्या कारचा चेंदामेंदा झाला. टोलनाक्यावरील खांब आणि डंपरच्या मध्ये कारचा सांगाडा अडकला होता.

अपघाताचे कारण आले समोर

मिळालेल्या माहितीनुसार, डंपर डेहरादूनवरून डोईवालाकडे जात होता. लच्छीवाला टोलनाक्याजवळ आल्यानंतर चालकाने ब्रेक लावला, मात्र ब्रेक फेल झाल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि समोर उभ्या असलेल्या गाड्या चिरडल्या गेल्या. 

अपघाताचा व्हिडीओ बघा

यात दोन कारचा चुराडा झाला, तर एका गाडीतील दोघे जागीच ठार झाले आहेत. कारचा चेंदामेंदा झाल्याने दोन मृतदेह दबले गेले होते. पोलिसांनी बऱ्याच वेळानंतर ते बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

मृतांची ओळख पटली

मृतांपैकी एका व्यक्तीची ओळख पटली असून, त्यांचे नाव रतनमणी उनियाल असे आहे. ते डेहरादूनमधील रायपूर येथील इंद्रप्रस्थ इनक्लेव्ह येथील रहिवासी आहेत. दुसऱ्या मयत व्यक्तीकडे किशोरी लाल पवार नाव असलेले ओळखपत्र सापडले आहे. त्याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातViral Videoव्हायरल व्हिडिओtollplazaटोलनाकाPoliceपोलिस