VIDEO: "सैराट" आजीचा झिंगाट डान्स पाहिला का ?

By Admin | Updated: June 28, 2017 12:59 IST2017-06-28T12:59:43+5:302017-06-28T12:59:43+5:30

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक आजी सैराट गाण्यावर नाचताना दिसत आहे

VIDEO: Did you watch the "Sairat" grandmother's zodiac dance? | VIDEO: "सैराट" आजीचा झिंगाट डान्स पाहिला का ?

VIDEO: "सैराट" आजीचा झिंगाट डान्स पाहिला का ?

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - सैराट चित्रपटाला रिलीज होऊन आता वर्ष पुर्ण झालं, मात्र चित्रपटाचं वेड काही कमी होताना दिसत नाही. खासकरुन चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांनी लावलेलं वेड अद्यापही कायम आहे. त्यातील झिंगाट गाण्यावर तर इतकं प्रसिद्द झालं आहे की, मराठी सोडा हिंदीपासून ते इतर भाषांच्या कार्यक्रमातही हे गाणं हमखास वाजताना दिसतं. लहानांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळेच जण हे गाणं लागलं की ठेका धरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक आजी सैराट गाण्यावर नाचताना दिसत आहे. 
 
या आजींचा हा डान्स तरुण पोरींनाही लाजवेल असा आहे. एका डान्स अकॅडमीचा हा कार्यक्रम असल्याचं दिसत आहे. कार्यक्रमातील अँकर आजींना स्टेजवर बोलावतो आणि डान्स करण्याची विनंती करतो. यानंतर संपुर्ण स्टेज फक्त त्या आजींचा असतो. सैराट गाणं लागतं आणि आजींचा डान्स सुरु होता. त्यांच्याकडून अनपेक्षित असलेला तो डान्स पाहून प्रेक्षकही भारावतात आणि हॉलमध्ये एकच दंगा सुरु होतो. आजींच्या त्या अदा, डान्स आणि एनर्जी तरुणांनाही लाजवेल अशी आहे. 
 
या व्हिडीओची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र  सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 
 

Web Title: VIDEO: Did you watch the "Sairat" grandmother's zodiac dance?