शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Video : कोरोना गो... गो कोरोना गो... व्हायरसला पळविण्यासाठी आठवलेंची प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 10:30 IST

रिपल्बिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाल आहे.

मुंबई - संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. मात्र, अशातच कोरोना व्हायरसचे देशात 45 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याबाबत मोठ्या प्रमाणात जगजागृती करण्यात येत आहे. तर, आरोग्यमंत्र्यांकडूनही योग्य ती माहिती पुरविण्यात येत आहे. मात्र, केंद्रीयमंत्रीरामदास आठवलेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

रिपल्बिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्रीरामदास आठवले यांचा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाल आहे. त्यामध्ये, चायना-इंडिया साँग असे म्हणत, रामदास आठवले कोरोनो गो... गो कोरोना... गो... असे म्हणत आहेत. तर, आठवलेंसमवेत असलेला विदेशी नागरिकही गो कोरोना... कोरोना गो... असे म्हणत आहे. विशेष म्हणजे भारतीय ध्वजाचं चिन्ह असलेला एक फलकही या नागरिकांसोबत दिसत असून समोर मेणबत्ती पेटवलेल्या दिसत आहेत. रामदास आठवलेंच्या या व्हिडीओवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलंय. तसेच, केंद्रीयमंत्र्यांना हे शोभतं का, असा सवालही नेटीझन्सने केलाय. विशेष म्हणजे काही भाजपा नेत्यांनी यापूर्वी गोमुत्र आणि शेणाने कोरोना बरा होतो, असे विधान केले  होते. 

दरम्यान, महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. या रुग्णांवर नायडू हॉस्पिटल येथे विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे.  मात्र नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही असं आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आलं आहे. 

होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गावोगाव भरणाऱ्या यात्रा, ऊरुस पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असं प्रशासनाने सांगितले आहे. होळी सण कुटुंबासोबतच साजरा करा असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाRamdas Athawaleरामदास आठवलेchinaचीनministerमंत्री