शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Video: पप्पा, नका ना कामाला जाऊ; पोलिसाच्या मुलाची वडिलांना विनवणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 13:44 IST

लोकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणारा पोलीस जेव्हा घरातून बाहेर पडतो, तो पुन्हा घरी कधी परतेल याचा नेम नसतो. अचानक काही घडलं तर पोलिसांना घरीही जाता येत नाही

नवी दिल्ली - लोकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणारा पोलीस जेव्हा घरातून बाहेर पडतो, तो पुन्हा घरी कधी परतेल याचा नेम नसतो. अचानक काही घडलं तर पोलिसांना घरीही जाता येत नाही. 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या या पोलिसाना घरच्यांना वेळही देता येत नाही. सध्या सोशल मिडीयावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुमच्या डोळ्यातूनही अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. शनिवारी ट्विटवर एका पोलिसाने हा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर सोशल मिडीयात व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. जेव्हा पोलीस आपल्या शरीरावर वर्दी चढवून तयार होतो. त्यावेळी त्याचा मुलगा वडिलांचे पाय धरून जोरजोरात रडू लागतो. तो पोलीस कर्मचारी मी घरी लवकर परततो असं सांगूनही मुलाचं रडणं थांबत नाही. 

1.25 सेकंदाचा हा व्हिडीओ एका आयपीएसने ट्विटवरुन शेअर केला आहे. @arunbothra यांच्याकडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यामध्ये लिहिलं आहे की, ही वेळ पोलिसाच्या नोकरीची सर्वात भावूक वेळ असते. कठीण प्रसंग आणि 24 तास ड्युटी अशा परिस्थितीतून पोलीस अधिकाऱ्यांना या स्थितीचा सामना करावा लागतो. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी तयारी करुन घरातून बाहेर निघत असतो. तेव्हा त्याचा मुलगा पाय धरून रडत असतो. पोलीस कर्मचारी मुलाला वारंवार समजवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र मुलगा कोणत्याही परिस्थितीत वडिलांना सोडायला तयार नसतो. ही परिस्थिती या एका पोलिसाची नाही तर पोलीस दलात काम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पडणारा पोलीस कायम लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर ड्युटी करत असतो. या व्हिडीओला अनेकांना लाईक्स केलं असून पोलिसांच्या कार्याला सलामदेखील केला आहे.   

टॅग्स :PoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया