शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पोलीस स्टेशनमध्ये पोलिसाचा बॉलिवूड गाण्यावर डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 12:25 IST

पोलीस स्टेशनमध्ये बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करतानाचा एका पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

ठळक मुद्दे पोलीस स्टेशनमध्ये बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करतानाचा एका पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. . एक पोलीस कर्मचारी बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसतो आहे. तर दुसरा पोलीस त्या नाचणाऱ्या पोलिसाचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना दिसतो आहे.

आसनसोल- पोलीस स्टेशनमध्ये बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करतानाचा एका पोलिसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. एक पोलीस कर्मचारी बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसतो आहे. तर दुसरा पोलीस त्या नाचणाऱ्या पोलिसाचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना दिसतो आहे. या दोघांवरही बंगाल पोलिसांनी रविवारी कारवाई केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सधन मोंडल हे या व्हिडीओमध्ये बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ हिरापूर पोलीस स्टेशनमधील आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी ड्युटीवर असताना बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करतो आहे. तर पोलीस स्टेशनमधील काही महिला अधिकारी टाळ्या वाजवताना व हसताना दिसत आहे. एक मिनिटांची ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  

या प्रकरणी आसनसोल दुर्गापूर पोलीस आयुक्तालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या बाबतीत अशा प्रकारची प्रकरण समोर आल्यास लोकांच्या डोळ्यातील पोलिसांची प्रतिमा कमी होईल. म्हणूनच शिस्त आणि कार्यक्षमता पाळणं गरजेच आहे, असं मत एका पोलिसाने व्यक्त केलं आहे. 

आसनसोल-दुर्गापूर आयुक्तालयाच्या अधिकारी लक्ष्मी नारायण मीना यांनी म्हंटलं की, या प्रकरणानंतर आम्ही दोन पोलिसांवर पोलीस स्टेशनमध्ये बंदीची कारवाई केली आहे. या प्रकरणात आरोपी पोलिसांना कारणं विचारली जातील. तसंच त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये बाहेरची व्यक्ती उपस्थित होती का ? याचाही तपास सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे