युपीतल्या मुलीचं सौदीतल्या मुलाशी व्हिडीयो कॉन्फरन्सने लग्न
By Admin | Updated: May 9, 2017 13:42 IST2017-05-09T13:42:41+5:302017-05-09T13:42:41+5:30
तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी नी कसा करता येईल याचं एक वेगळंच उदाहरण समोर आलं आहे. मुझफ्फरनगरमधल्या श्यामली इथल्या एका मुस्लीम मुलीचं लग्न सौदी अरेबियातल्या मुलाशी झालं आहे

युपीतल्या मुलीचं सौदीतल्या मुलाशी व्हिडीयो कॉन्फरन्सने लग्न
>ऑनलाइन लोकमत
मुझफ्फरनगर, दि. 9 - तंत्रज्ञानाचा वापर कशासाठी नी कसा करता येईल याचं एक वेगळंच उदाहरण समोर आलं आहे. मुझफ्फरनगरमधल्या श्यामली इथल्या एका मुस्लीम मुलीचं लग्न सौदी अरेबियातल्या मुलाशी झालं आहे. मुलगा सौदीमध्ये नी मुलगी भारतातल्या उत्तर प्रदेशमध्ये असून धर्मगुरूंनी व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून लग्नाचे विधी पार पाडले आणि लग्न झाल्याचे जाहीर केले.
मुलीचे वडील रेहान यांनी सांगितले की हा निकाह 5 मे रोजी करण्याचे ठरले होते. परंतु मोहम्मद अबिद हा नवरा मुलगा वेळेत पोहोचू शकला नाही. त्यामुळे आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरवले. दोन्ही ठिकाणी त्या त्या घरचे नातेवाईक उपस्थित होते. व्हिडीयो कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क प्रस्थापित करण्यात आला. निकाहाचा विधी करणारे धर्मगुरू उपस्थित होते. त्यांनी आवश्यक ते विधी केले आणि लग्न झाल्याचे जाहीर केले.