व्हिडिओ - दिल्लीत कारने मुलीला उडवलं, सुदैवाने बचावली
By Admin | Updated: May 20, 2016 14:38 IST2016-05-20T14:22:04+5:302016-05-20T14:38:52+5:30
रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या सॅट्रो कारने दिलेल्या धडकेत 16 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे

व्हिडिओ - दिल्लीत कारने मुलीला उडवलं, सुदैवाने बचावली
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 20 - रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या सॅट्रो कारने दिलेल्या धडकेत 16 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. मधु विहार परिसरात ही घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पुनमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेनंतर नगारिकांनी वाहनचालकाला चांगलाच चोप दिला मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुनम शिकवणीवरुन घरी जात असताना संध्याकाळी 5 वाजता हा अपघात झाला. पुनम नेहमीप्रमाणे रस्त्यावरुन घरी जात होती. रस्त्यावर रहदारी जास्त असल्याने वाहतुकीची कोंडी होती. त्यावेळी अचानक सॅट्रो कारने वेग घेतला आणि मोकळ्या जागेतून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कार पुढे घेतल्यानंतर सरळ जाण्याऐवजी त्याने डाव्या बाजूला वळवली. पुनमला काही कळण्याआधीच कारने तिला उडवले. धडक इतकी जोरदार होती की पुनम हवेत उडून बोनेटवर आदळली.
अपघातानंतर वाहनचालकाने गाडी थांबवली होती. जमलेल्या लोकांनी यावेळी त्याला चांगलाच चोप दिला. मात्र नंतर त्याने पलायन केले. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्याची ओळख पटली आहे. लवकरच त्याला अटक केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
WATCH: Horrific accident caught on camera in Delhi's Madhu Vihar,victim girl escapes alivehttps://t.co/3Br7jx76lA
— ANI (@ANI_news) May 20, 2016