उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यात असलेल्या कांची धाम परिसरात भयंकर अपघात झाला. भाविकांना घेऊन जात असलेली कार खोल दरीत कोसळली. यात तीन जणांचा मृत्यू झाला. यात दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. १८ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून ७ लोक प्रवास करत होते. सर्वजण कांची धामकडे जात होते. पण, अपघातात सात पैकी तिघांचा मृत्यू झाला. रस्त्याने जात असलेली कार अचानक नियंत्रण सुटून ५० फूट खोल दरीत कोसळली.
माहिती मिळताच पोलीस आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तातडीने कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अपघात झाल्यानंतरचे व्हिडीओ आता समोर आले आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की, खाली कोसळल्यानंतर कारचा चेंदामेंदा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ कारमधून जात असलेले सगळे लोक बरेलीचे आहेत. कांची धामला पोहचण्यापूर्वीच त्यापैकी तिघांवर काळाने झडप घातली.
Web Summary : A car carrying pilgrims fell into a 50-foot gorge in Uttarakhand's Nainital district, killing three, including two women and a child. The accident occurred near Kanchi Dham. Police and rescue teams are assisting the injured. All seven occupants were en route to a pilgrimage.
Web Summary : उत्तराखंड के नैनीताल जिले में तीर्थयात्रियों को ले जा रही एक कार 50 फुट गहरी खाई में गिर गई, जिसमें दो महिलाओं और एक बच्चे सहित तीन की मौत हो गई। दुर्घटना कांची धाम के पास हुई। पुलिस और बचाव दल घायलों की सहायता कर रहे हैं। सभी सात लोग तीर्थयात्रा पर जा रहे थे।