VIDEO - "त्या" दोघींनी दरोडेखोरांचा बँक लुटण्याचा प्रयत्न उधळला

By Admin | Updated: April 4, 2017 14:18 IST2017-04-04T14:18:44+5:302017-04-04T14:18:44+5:30

हरयाणा गुरगावमध्ये दोन महिलांनी सशस्त्र दरोडेखोरांचा बँक लुटण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

VIDEO - "Both of them" tried to rob a robber bank | VIDEO - "त्या" दोघींनी दरोडेखोरांचा बँक लुटण्याचा प्रयत्न उधळला

VIDEO - "त्या" दोघींनी दरोडेखोरांचा बँक लुटण्याचा प्रयत्न उधळला

 ऑनलाइन लोकमत 

गुरगाव, दि. 4 - हरयाणा गुरगावमध्ये दोन महिलांनी सशस्त्र दरोडेखोरांचा बँक लुटण्याचा प्रयत्न उधळून लावल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. प्रसंगावधान राखून या महिलांनी जी हिम्मत दाखवली त्यामुळे ठेवीदारांचे लाखो रुपये चोरीस जाण्यापासून वाचले. 
दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर काहीवेळ प्रवेशव्दाराच्या टेबलावर तयारी करण्यासाठी घालवला.  
 
त्यानंतर ते तडक आत घुसले व महिला कर्मचा-यांना मारहाण सुरु केली. सुरुवातीला अचानक झालेल्या हल्ल्याने महिला बावरल्या. पण लगेच त्यांनी प्रतिकार सुरु केला व या दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. 
 
या दरम्यान महिलांनी आरडाओरडा करुन लोकांना गोळा केला. लोकांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर या दरोडेखोरांना बेदम चोपले. ही घटना घडली त्यावेळी बँकेत सुरक्षारक्षक नव्हता. महिलांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Web Title: VIDEO - "Both of them" tried to rob a robber bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.