VIDEO : ...अन् त्यानं मृत्यूला परतवून लावलं

By Admin | Updated: April 28, 2017 16:07 IST2017-04-28T16:07:48+5:302017-04-28T16:07:48+5:30

"देव तारी त्याला कोणी मारी", या म्हणीचा प्रत्यय पंजाबमधील जालंधर येथील एका घटनेदरम्यान आला आहे.

VIDEO: ... and he has brought death to death | VIDEO : ...अन् त्यानं मृत्यूला परतवून लावलं

VIDEO : ...अन् त्यानं मृत्यूला परतवून लावलं

ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 28 - "देव तारी त्याला कोणी मारी", या म्हणीचा प्रत्यय पंजाबमधील जालंधर येथील एका घटनेदरम्यान आला आहे. जालंधर येथील एका रस्ते अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून सुखरुपपणे जिवंत वाचल्याचे दिसत आहे.
 
जालंधर येथील एका पुलावर भरधाव येणा-या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक दुस-या मार्गावर येऊन कोसळला. ज्यावेळी हा ट्रक खाली कोसळला तेव्हा तेथून एक जण सायकलवरुन जात होता. पण "काळा आला होता वेळ नाही", असंच काहीसं घडले. 
 
या दुर्घटनेवेळी प्रसंगावधान दाखवत त्यानं स्वतःचा जीव वाचवला व मृत्यूला माघारी परतवून लावले, असेच म्हणावे लागेल. 
मात्र, या घटनेत हा अपघातग्रस्त ट्रक एका रिक्षा कोसळल्याने ट्रक आणि  रिक्षाचे चालक जखमी झाले आहेत. 
 

Web Title: VIDEO: ... and he has brought death to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.