व्हिडिओ - अहमदाबादमध्ये कारने दोघांना चिरडलं

By Admin | Updated: June 15, 2016 11:30 IST2016-06-15T11:30:49+5:302016-06-15T11:30:49+5:30

अहमदाबादमध्ये पानपट्टीवर चर्चा करत बसलेल्या दोघा तरुणांना कारने चिरडलं असून हा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे

Video - In Ahmedabad, a car collided with both | व्हिडिओ - अहमदाबादमध्ये कारने दोघांना चिरडलं

व्हिडिओ - अहमदाबादमध्ये कारने दोघांना चिरडलं

>ऑनलाइन लोकमत - 
अहमदाबाद, दि. 15 - शहरातील एक भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वेजलूपर भागात हा अपघात झाला आहे. एका पानपट्टीसमोर दोन तरुण चर्चा करत बसले होते. त्याचवेळी काही कळण्याचा आत समोरुन भरधाव वेगानं गाडी आली आणि अक्षरक्ष: त्यांच्या अंगावर गेली. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मात्र गाडी झाडावर आदळल्याने तीव्रता कमी झाली. एवढा भीषण अपघात होऊनदेखील दोघेही तरुण सुदैवाने बचावले आहेत. दोघे तरुण जखमी झाले असून स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 
 

Web Title: Video - In Ahmedabad, a car collided with both