विदर्भ-विश्वचषक क्रिकेट स्यावर धाड
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
विश्वचषक क्रिकेट स्यावर धाड
विदर्भ-विश्वचषक क्रिकेट स्यावर धाड
विश्वचषक क्रिकेट सट्ट्यावर धाडवणी (यवतमाळ) : विश्वकप क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्यावर अनेकांनी सट्टा लावल्याची माहिती मिळताच वणी पोलिसांनी येथील अड्ड्यावर धाड मारली. यावेळी एका नगरसेवकासह चौघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी १ लाख ५१ हजार रुपयांचा माल जप्त केला़वणी पोलिसांनी येथील टॉकीज परिसरातील अल्ताफ ताजुद्दीन शेख याच्या राहत्या घरी धाड घातली़ या धाडीत एलईडी, लॅपटॉप, १० मोबाईल, दोन पॅड, दोन चार्जर, दोन रिमोट, सेटअप बॉक्ससह रोख ९ हजार ४१० रूपये असा १ लाख ५१ हजार ६१० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ या धाडीत अल्ताफ ताजुद्दीन शेख, नगरसेवक मो़कैसर अब्दुल गनी, अजहर शेख रौफ शेख व संजय बालाजी बावणे या चौघांना क्रिकेट सट्टा खेळताना ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्याविरूध्द मुंबई जुगार ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला़ ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक दीपक पवार, अरुण नाकतोडे, गोपाल वास्टर, सै. साजीद, सुधीर पांडे, विकास धडसे, वसंता चव्हाण, शेख नफिस, मनोहर पवार, नरेश राठोड, बाळा गवारकर यांनी सहभाग घेतला. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरूच होती़ (प्रतिनिधी)